वागररी (एस.के. गायकवाड) :-
रिपाइं (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे शासकी विश्रागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची तालूकास्तरीय विशेष बैठक संपन्न झाली असून या बैठकित पक्षाच्या नूतन तालूका कार्यकारणी पदाधिकारी व जिल्हा कार्यकारणीत निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी केंद्रीय सामाजिक न्याय व आधिकारिता राज्य मंत्री नामदार रामदास आठवले यांची नुकतच फेरनिवड झाल्या बद्दल त्यांच्या आभिनंदनाचा महत्वपूर्ण ठराव ही घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्याक्ष विद्यानंद बनसोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं (आठवले ) चे मराठवाड विभाग प्रदेश कार्याध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे आदी होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना राजाभाऊ ओव्हाळ म्हणाले की रिपब्लिकन पक्षात बंधुभाव,समानता व न्यायीक लोकशाही असून सर्व बहुजनांचे नेत्रत्व करणारा हा पक्ष आहे. नुतन पदाधिकार्यांचा सन्मान सोहळ्याने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढते त्याना जबाबदारीची जाणीव होते.सन्मान सोहळ्यात मिळणाऱ्या हार फुलांची किंमत करता येत नाही त्या पाठीमागे असलेली भावना महत्वाची असून समाजाच ओझं आपल्या खांद्यावर आलेले आहे याची जाणिव ठेवून कार्यकर्त्यानी समाजाच्या न्याय हक्कासाठी, गोरगरीब बांधवांच्या आर्थिक विकास करण्याचा आणि समाजाच संघटन करण्याचा प्रयत्न करावे.लोकचळवळ सक्रिय झाल्याशिवाय रिपब्लिकन चळवळ गतीमान होणार नाही.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात कार्यकर्ते जमा होऊन हालग्यांच्या,फटाक्यांच्या आतिशबाजीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.रामदासजी आठवले यांची रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी पुनश्च बिनविरोध निवड झाल्याबद्दल पेढे वाटून . उत्सव साजरा करून तुळजापूर येथिल शासकीय गेस्ट हाऊस येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे हितचिंतन युवा कार्तकर्ते महादेव जेरीथोर यांच्या वतीने नुतन धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, जिल्हा चिटणीस डिगंबर कांबळे, तुळजापूर तालुकाध्यक्ष अरूण लोखंडे,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तालुका उपाध्यक्ष किसन पांडागळे,तालुका सचिव,सुरेंद्र सुर्यवंशी,तालुका संघटक सुरेंश लोंढ,नळदुर्ग शहराध्यक्ष मारूती खारवे, तुळजापूर शहराध्यक्ष वैजिनाथ पांडागळे, युवक तालुकाध्यक्ष शुभम कमलचंद कदम, युवक तालूका सरचिटणी प्रदिप सिरसाट आदिंच्या सार्थ निवडी निमित्त सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नामदार रामदास आठवले यांची रिपाइंच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पूनश्च फेरनिवड झाल्या बद्दल त्यांच्या आभिनंदनाचा ठराव युवा तालूका अध्यक्ष शुभम कदम यानी मांडला त्यास रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यानी अनूमोदन दिले. सर्वानूते प्रचंड टाळयाच्या गजरात हा ठराव सहमत करण्यात आला.
यावेळी युवा कार्यकर्ते महादेव जेटीथोर,नाशिक कांबळे, उपसरपंच भिमराव सोनवणे, सुधाकर मस्के, सुभाष मस्के, विकास ठाकूर, महादेव सोनवणे, चंचल कदम, अनिल तुळसे, सचिन प्रताप, दिलीपराव भांगे, पप्पू सर्जे, रईस पटेल, डिगंबर कांबळे,काकासाहेब भंडारे, वैभव जानराव, दिलीप मस्के, नागेश दिवटे आदिंसह रिपाइंचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






