spot_img
spot_img
spot_img

मुस्लीम समाजाच्या पारंपारिक व्यवसायावर मनुवाद्याची कुऱ्हाड . नळदुर्ग येथे अप्पर तहसिल कार्यालया समोर अंदोलन 

जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा 

नळदुर्ग प्रतिनिधी. (दादासाहेब बनसोडे )

गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करा नळदुर्ग अप्पर तहसिल कार्यालया समोर नळदुर्ग येथील मुस्लीम समाजाने ठिय्या आंदोलन केले महाराष्ट्रात गोवंशी हत्याबंदी कायदा २०१५ ला बंद लागु झाला यात अनेक संघटना संस्था गोवंश हत्या प्रकरणी प्रभावी झाल्या

कठोर कारवाई करावी सुद्धा होऊ लागली गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमल बजावणीसाठी आयोग स्थापन करण्याच्या हलचाली सुरु झाल्या परंतू मुस्लीम समाजाच्या पारंपारिक व्यवसाय सतत चालू आसावा आणि कुटुंबाच्या पोटाची खळगी भरावी यासाठी व्यवसाय करणे गरजेचे आहे परंतू महाराष्ट्रात शेतक ऱ्याच्या भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला भाकड जनावरांच्या छावण्या खुप मोठ्या प्रमाणात आसतात भाकड जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय मोठा होतो व्यवसाय दाराकडे परवाने सुद्धा आहेत परंतू भाकड जनावरे कत्तली साठी वापरली जात नाहीत तरीसुद्धा द्वेश भावनेतुन कुरेशी व्यापाऱ्यांना विशेष लक्ष करण्या करिता गोरक्षकांच्या नावाखाली एक मोठी गुंडाची टोळी महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे . वारंवार समाजावर गोरक्षकाच्या नावाखाली गाडी आडविणे धमकी देणे अन्याय अत्याचार करणे हा गावगुंडानी हाहाःकार उडवला आहे आणि कुरेशी समाजाचे जीवन जगण्याचा मार्ग चक्क बंद केला आहे .

गोरक्षकांच्या नावाखाली जातीयवादी लोकांची आशीच गुंडशाही चालू ठेवली तर महाराष्ट्रात

हुकुमशाही निर्माण होईल यासाठी प्रशासनाने सामाजिक आर्थिक किंवा जातीय सलोखा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे . खालील मागण्याचे निवेदन नळदुर्ग येथील अप्पर तहसिल कार्यालयाचे अप्पर तहसीलदार प्रमोद गायकवाड

यांच्याकडे देण्यात आले . यावेळी नळदुर्ग अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी कायदेशीर संरक्षण अंमलबजावणी करणारी बिंदू नियमावली जारी करण्यात यावी , बेकायदेशीर गोरक्षण केंद्र तात्काळ बंद करण्यात यावेत शिवाय न्यायालयीन मान्यता नसलेले केंद्र बंद करावे , कोंडावडा व त्या विषयी सुविधा त्वरित सुरूवात करावी, शासन स्तरावर स्थनिक पातळीवर कत्तलखाने निर्मिती करावी , आर्थिक व्यवहार पारदर्शक करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ऑनलाईन प्रणालीने अनिवार्य करावी , वाहतूक प्रमाणे ऑनलाईन त्वरित वितरण करणे , या विषयाला अनुसरून महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे यावेळी नळदुर्ग नगरीचे माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी , माजी नगराध्यक्ष शहबाज काझी , गफुर कुरेशी , बरकत कुरेशी , रहमान कुरेशी , इक्बाल कुरेशी , शाहेद कुरेशी , बकर कुरेशी , कुरेशी ,मोहसीन कुरेशी , निहाल कुरेशी हजर जाहीर झाला अभिजीत कुरेशी , हसन कुरेशी , हुसेन कुरेशी लहुजीशक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड , आर पी आयचे नेते बाबासाहेब बनसोडे , तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे ,एस के गायकवाड राजेंद्र शिंदे भीमअण्णा संघटना लखन गुरवे यांच्यासह शेकडो व्यावसायिक तहसील कार्यालय नळदुर्ग येथे ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले आणि या मागणीचे निवेदन नळदुर्ग येथील अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार पी एस गायकवाड यांच्याकडे देण्यात आले

Related Articles

ताज्या बातम्या