नंदगाव ( शाम नागिले ) : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गाय चोरल्याचे कारण पुढे करुन बसस्थानकावरून एका मागासवर्गीय बौद्ध तरुणाचे अपहरण करून त्याला विवस्त्र करून अमानूषपणे बेदम मारहाण केली.त्या मारहाणीत त्याचा एक डोळ निकामी झाल्याची निंदनीय घटना घडली असून या निंदनीय घटनेचा दलित पँथर धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने व नळदुर्ग ता. तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करून या घटनेतील आरोपीना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कडक कारवाई करावी अशी मागणी नळदुर्ग येथील अप्पर तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत सविस्तर असे की, दलित पँथर धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने व रिपाइं (आठवले)नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की नुकतच खामगाव जिल्हा बुलढाना येथील मागासवर्गीय बौध्द समाजातील २४ वर्षीय तरुण रोहन पैठनकर याला खामगाव येथील बस स्थानक परिसरातून अपहरण करून येथील गावगुंड गब्बु गुजरीवाल, रोहीत पगारीया, प्रशांत संगेल या तिघानी बाजुला मैदानात घेवून गेले व गाय चोरीचा अरोप करून त्याला विवस्त्र करून कायदा हातात घेवून बेदम मारहाण केली.या मारहाणीत रोहन पैठनकर यांचा एक डोळा निकामी झाला. ही घटनाचं मानवतेला काळीमा फासणारी असून निंदनिय आहे या निंदणीय घटनेचा दलित पँथर धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने व रिपाइं(आठवले) च्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून या घटनेतील फरार आरोपीस तात्काळ अटक करून वरिल तिनीही आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अन्यथा या संर्भात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा लेखी इशारा ही देण्यात आला आहे.
यावेळी अप्पार तहसिलदार यांचे प्रतिनिधी म्हणून महसुल सुहाय्यक समाधान पोथरे यांच्या उपस्थिती मंडळ अधिकारी डी.एम. कांबळे यानी निवेदन स्विकारले.या निवेदनाची एक प्रत माहितीस्तव नळदुर्ग पोलीस ठाण्याले स.पो.नी. नांगरे साहेब याना ही देण्यात आली आहे..
याप्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनावर दलित पँथरचे जिल्ह संपर्क प्रमुख शामकांत नागीले, रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, रिपाइं तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे,रिपाइं (आठवले)चे नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे, रिपाइं अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिदभाई कुरेशी, रिपाइंचे तालूका संघटक सुरेश लोंढे, संघटन सचिव दत्ता बनसोडे, येडोळ शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे,उपाध्यक्ष मारुती लोंढे, रिपाइं जळकोट शाखा अध्यक्ष आरविंद लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी, रावसाहेब वाघमारे,सह कार्यकार्यांच्या सह्या आहेत.






