वागदरी ( एस. के. गायकवाड ):
तुळजापूर तालूक्यातील मौजे येडोळा व वागदरी येथे वर्षवास निमित्ताने सामुदायिक बुद्ध वंदना व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. .
येडोळा येथील आंबेडकर भवनमध्ये सिद्धार्थ बुद्ध विहार कमिटी व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास निमित्ताने बुद्ध वंदना व धम्मदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्त कैलास गवळी गुरूजी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पांडगळे, तालुका सरचिटणीस राकेश जेटिथोर, बौद्वाचार्य तथा केंद्रीय शिक्षक बाळासाहेब बागडे गुरूजी आदी होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदना व भीमस्तुती घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्री कदम यांनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपन सर्वांनी बौद्ध धम्माचे अतिशय प्रभावीपने तंतोतंत पालन केले पाहिजे असे मत मांडले तर विश्वास भाऊ पांडगळे व बाळासाहेब बागडे गुरूजी यांनी बौद्ध धम्मात वर्षभरात येणाऱ्या सर्व पौर्णिमांचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन अमर जेटीथोर यांनी केले.यावेळी रमाई महिला मंडळाच्या सविता लोंढे सुनीता लोंढे सुवर्णा लोंढे उषा लोंढे महादेवी लोंढे साळुं लोंढे रागिणी लोंढे रतन लोंढे शितल लोंढे छबूबाई लोंढे सुनीता वाघमारे उषा गायकवाड नागरबाई जेटिथोर मैना कांबळे,करुणा लोंढे पार्वतीबाई लोंढे स्नेहा लोंढे सह सिद्धार्थ बुद्ध विहार कमिटी तसेच सिद्धार्थ क्रीडा व युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी विश्वास पांडगळे सरानी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ मंडळास भेट दिला.
तसेच पंचशिल बुद्ध विहार कमिटी वागदरी व भारतिय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव यांच्या संयुक्त विद्यामाने वागदरी ता.तुळजापूर येथेही वर्षावास निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी माजी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे व भारतिय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतिय बौद्ध महासभेचे बाळासाहेब बागडे गुरुजी यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे विश्वास भाऊ पांडागळे, राकेश जेरीथोर,कैलास गवळी गुरुजी, पंचशिल बुद्ध विहार समिती वागदरीचे सचिव एस.के. गायकवाड, सुर्यकांत वाघमारे, श्रीदेवी वाघमारे,कविता गायकवा, गिताबाई झेंडरे, उज्वला वाघमारे,कविता संदिपान वाघमारे, कमल धाडवे, ठकूबाई वाघमारे,सह शालेय विद्यार्थी आपस्थित होते.






