वागदरी (एस. के. गायकवाड ):
कुनबी मराठा आंदोलनाचे जनक अंतरावली सराठी येथील संघर्ष नायक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुंबई येथे दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी मराठा आरक्षण मागणी करिता आयोजीत आंदोलनास बोळेगाव ता.तुळजापूर येथून शेकडो कार्यकर्ते जाणार असा निर्धार येथील बैठकीत करण्यात आला.
सरसकट मराठा समाजाला कुनबी मराठा जातीचे दाखले देवून त्यांना ओबीसी प्रवर्गाततील आरक्षणाचा लाभ द्यावा या मागणीकरित मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिं.२९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजीत मोर्च्याच्या पूर्व तयारी संदर्भात मराठा क्रांती मोर्चाये नेतृत्व तेजस बोबडे बप्पा नवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोळेगाव ता.तुळजापूर येथे नूकतच बैठक घेण्यात आली यावेळी उपस्थितीत मान्यवर सरपंच विलास पाटील तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी पोलीस पाटील कडाजी सूर्यवंशी सुरवसे ग्रामपंचायत सदस्य सुनील सूर्यवंशी सोपान सुरवसे माजी सैनिक सतीश सूर्यवंशी माजी सरपंच गुणवंत रुपनर संजय सुरवसे विनोद सुरवसे परमेश्वर सुरवसे सदानंद सुरवसे संजय सुरवसे अरुण शिवाजी सुरवसे पवन सुरवसे बालाजी सुरवसे राहुल सुरवसे दत्ता जाधव राम सुरवसे अंगत जाधव प्रतिष्ठित नागरिक व युवा वर्ग शहाजी अनंत सुरवसे नागेश हलोरे गोरख चव्हाण रामचंद्र सुरवसे कमल काळे दत्ता साळुंखे महिला सखुबाई सुरवसे विजयाबाई काळे चमाबाई सुरवसे प्रेमीला सुरवसे सरुबाई सुरवसे संगीत सुरवसे द्रोपती रुपनर सह शेकडो कार्यकर्त्यानी सदरआंदोलनामध्ये स्वखर्चाने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे






