spot_img
spot_img
spot_img

अणदूर येथील जवाहर महाविद्यालयात रक्षाबंधन साजरा

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर :विजय पिसे जळकोट

अणदूर येथील जवाहर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्यावतीने संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ.सत्येंद्र राऊत यांच्या पुढाकारातून शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.सत्येंद्र राऊत संस्कृत भाषा व रक्षाबंधनाचे भारतीय संस्कृतीत खूप मोठे स्थान असून हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो असे सांगितले. यानंतर कु. शीतल नरे हिने रक्षाबंधन हा सण कसा पवित्र व प्रेमाचा आहे, हे सांगून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी सरांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ. अनिता मुदकण्णा यांनी प्रा. राऊत यांना राखी बांधून विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कु. लक्ष्मी शेवाळकर, कु. सुहाना पटेल, कु. खुशी गायकवाड, कु. अश्विनी गायकवाड, कु.प्रीती चंदनशिवे, कु. साक्षी चव्हाण यांनी प्राचार्य डॉ.उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ. मल्लीनाथ लंगडे, कार्यक्रमाचे आयोजक प्रा. सत्येंद्र राऊत तसेच जवाहर करियर अकादमीचे समन्वयक डॉ. सिद्धेश्वर बाड सर यांना राख्या बांधल्या. त्यानंतर महाविद्यालयात अध्ययन करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुलींच्या हस्ते राख्या बांधून मिठाई भरविण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. मल्लीनाथ लंगडे सर अध्यक्षीय भाषणात संस्कृत विषयाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयात व पोलिस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा हा सामाजिक उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत असतात सरांनी याप्रसंगी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन हा सण प्रेम, बंधुत्व, विश्वास व एकतेचे प्रतीक आहे आणि प्रत्येक भावाने संकटाच्या वेळी बहिणीचे रक्षण करण्याचे आवाहन करुन महाभारतातील श्रीकृष्ण व द्रौपदीची उदाहरणे दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा.सत्येंद्र राऊत आणि संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.खुशी गायकवाड व आभार प्रदर्शन कु. साक्षी चव्हाण हिने केले.

Related Articles

ताज्या बातम्या