वाढदिवस विशेष
अणदूर प्रतिनिधि . आर. एस. नावाचा वादळ गेल्या चार दशकापासून विविध क्षेत्रात-माध्यमात मात्र स्वकर्तुत्वाने पंचक्रोशी बरोबरच आता मात्र जिल्हाभर व्यापल्याचे चित्र निश्चितच आयत्या बिळावर…. थय थयाट करणाऱ्याना प्रेरणा व दिशादर्शक ठरणार आहे. वंचित आघाडीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तथा तळागाळातील जनतेचा आवाज सन्माननीय आर. एस. गायकवाड यांचा आज 16 ऑगस्ट जन्मदिन त्यानिमित्ताने थोडेसे…..
आर एस नाव जरी राजकुमार असले तरी ही लहानपणापासूनच असंख्य अडचणी, समस्या, हेवे -दावे यावर मात करून आदर्श कुटुंब प्रमुखची यशस्वी जबाबदारी खरोखरच वाखाणन्याजोगी आहे. वडील श्रीरंग, मास्तर म्हणून त्यांची जनमानसात खास ओळख, तेही कट्टर लोकशाही समर्थक, तापट स्वभाव मात्र मेनाहून ही माऊ त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून स्वाभिमान व निस्वार्थ भावनेने काम करताना पावलो पावली दिसतात.
सर्व रोगावर या कलियुगात रामबाण औषध आहे, मात्र स्वभावाला जगाच्या पाठीवर औषध भेटणार नाही. तद्वतच अनेक निवडणुकीत त्यांनी स्वतःची भाकरी खाऊन तत्त्वनिष्ठ राजकारण केले हे मात्र नाकारता येत नाही. पस्तीस वर्षांपूर्वी त्यांचा स्वतःचा स्पीकर मंडपाचा व्यवसाय होता. एवढेच नव्हे तर त्याकाळी स्क्रीनवर गावागावात अस्सल मराठी पिक्चर दाखवले जात असत. मात्र त्यांनी कधीही स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही वस्तुस्थिती आहे. काळ येतो आणि जातो मात्र आठवणी कायम ठेवून जातो हा इतिहास कोणाला विसरता येणार नाही. आर एस ने अनेक उन्हाळे- पावसाळे पाहिले त्याकाळी भावना चल-बीचल झाली असते तर आजची ही परिस्थिती निश्चितच वेगळी पाहायला मिळाली असती.
आर. एस. समोर आपला-तुपला, जवळचा-लामचा हा भेदभाव त्यांना न पटणारा, जे आहे ते समोर असा त्यांचा पिंड… राजकारनापलीकडचे माणसे त्यांच्या सहवासात पहावयास मिळतात. समाजकारणाने माणसे घडवायचे-जोडवायचे किंबहुना परिवर्तनाकडे झुकवणारी वाटचाल दिशादर्शकच म्हणावे लागेल.
आर एस यांचा आज 16 ऑगस्ट जन्मदिवस, त्यांना समाजमनात अधिकाधिक सकारात्मक काम करण्याची प्रेरणा मिळावी एवढी अपेक्षा व्यक्त करून जन्मदिनास जय मल्हार पत्रकार संघ, खडकाळी ग्रुप, 8 फार्मा ग्रुप च्या वतीने अनंत अनंत शुभेच्छा…..
श्री. चंद्रकांत हगलगुंडे, पत्रकार ..8308789009






