नळदुर्ग ऐतिहासिक किल्ल्यातील नयम रम्य नर-मादी धबधबा ओसंडून वाहु लागला
———————————————-
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील १२६ एकरात पसरलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील नयन रम्य प्रेक्षणीय पाणी महाल येथील नर-मादी धबधबा ओसंडुन वाहु लागल्यामुळे पर्यटकांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यातील नयनरम्य दृश्य पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी सर्व परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामान्य नागरिक, यांच्या सह अधिकारी ही उपस्थित आसतात
नळदुर्ग आणि परिसरात दोन रात्रीचा जोरला पाऊस झाल्याने नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्प बोरीधरणाने चुळ टाकल्याने नळदुर्ग व परिसरातील नागरीक आनंदी झाले आहेत निसर्गाचे वरदान नळदुर्ग साठी कायम आसावे आशी प्रार्थना निसर्गाकडे करित आहेत राञी दमदार पाऊस झाल्यामुळे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून वाहून बोरी नदीमार्गे ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांच्या डोळ्याची पारणे फेडणारा नर -मादी धबधबा ओसंडुन वाहू लागला आहे. यामुळे पर्यटकांना नयनरम्य धबधबे पाहण्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.
नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्प बोरीधरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहीत झाल्यानंतरच किल्ल्यातील सर्व धबधबे वाहतात, धरणाच्या वरील होर्टी, गंधोरा, चिकुंद्रा या भागात मोठा पाऊस झाल्यामुळे बोरी धरण (कुरणूर प्रकल्प) पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे. यामुळे किल्ल्यातील ऐतिहासिक नरमादी धबधबा पाहण्यासाठी परिसरातील पर्यटक किल्ल्यात गर्दी केल्याचे दिसून येते आहे किल्ल्यात इ. स. १३ व्या शतकात तत्कालीन निजाम शासकाने बोरी नदी किल्ल्यात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधून त्यावर दोन धबधबे बांधून नदीचे पात्रातील अतिरिक्त पाणी याच दोन्ही धबधब्यातून वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय या मोठया प्रेक्षणीय नर -मादी धबधब्याला पाण्याचा लोड होऊ नये पाणी महालाच्या आलीकडे शिलक नावाचा धबधबा सरू केला आहे
सोलापूर येथीलयुनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे टेंडर झाल्यामुळे सदरील पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येणार असल्याचे दिसुन येत आहे
नळदुर्ग ऐतिहासिक प्रेक्षणीय व नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्याचे चिन्हे असल्याने नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून सुद्धा ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात पाणी महाल नर – मादी धबधबा या ठिकाणी पर्यटकांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात यावेत अशी विनंती पोलीस प्रशासनाला नागरिकातून केली जात आहे






