spot_img
spot_img
spot_img

नंदगावच्या उपसरपंच तथा प्रभारी सरपंच पदी पॅंथर शशिकांत नागिले यांची बिनविरोध निवड 

 

नंदगाव, दि.११ (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्याती नंदगाव येथील विद्यमान उपसरपंच सौं महादेवी भिमराव चिनगुंडे यांनी राजीनामा दिल्याने त्या जागेवर श्री. शशिकांत बळीराम नागिले यांची बिनविरोध नंदगाव उपसरपंच तथा प्रभारी सरपंच पदी निवड करण्यात आली.

या बाबत सविस्तर असे की • तुळजापूर तालुक्याती नंदगाव येथील अनुसूचित जमाती जागेवरील सरपंच सौ.राधिका विद्यानंद घंटे यांना तीन आपत्य कारणामुळे हे पद रिक्त झाले असून ती जबाबदारी उपसरपंच याच्या कडे देण्यात आली होती .विद्यमान उपसरपंच सौं महादेवी भिमराव चिनगुंडे यांनी राजीनामा दिल्याने त्या जागेवर दलित पॅंथर जिल्हा संपर्क प्रमुख शाम नागिले यांचे मोठे बंधु श्री. शशिकांत बळीराम नागिले यांची बिनविरोध नंदगाव उपसरपंच तथा प्रभारी सरपंच पदी निवड करण्यात आली. यावेळी अध्यासी निवडणूक अधिकारी म्हणून श्री. ए.सी. कावळे विस्तार अधिकारी (पं) पंचायत समिती तुळजापूर हे उपस्थित होते. सहायक म्हणून ग्रामसेवक राहुल कांबळे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य धंनराज कलशेट्टी , विरसंगप्पा जमादार , नागनाथ पाटील ,सूर्यकांत अरबळे ,कोमल काटे ,मीनाक्षी मोरे ,नंदाबाई कामशेट्टी , महादेवी चिनगुंडे , राधिका कांबळे , सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व पॅनल प्रमुख सिद्धेश्वर आण्णा कोरे , प्रशांत करंडे ,बसू कोरे ,सतीश काटे , इरन्ना वाले, सागर चौगुले, विश्वजित घंटे,मोहन मोरे,सचिन कोरे , सागर कांबळे ,अप्पू कोरे ,मल्लिनाथ कामशेट्टी , अध्यक्ष तुप्पे आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी पॅनल प्रमुख सिद्धेश्वर आण्णा कोरे यांनी उपसरपंच तथा प्रभारी सरपंच पदी शशिकांत नागिले यांना पुढील कार्यकाळास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या