अणदूर/प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावचे सुपुत्र राजकुमार गाढवे यांची नुकतीच बजरंग दलाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे अणदूरसह संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकुमार गाढवे हे लहानपणापासूनच संघटनात्मक कामाशी जोडलेले असून ते विद्यार्थी अवस्थेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व बजरंग दलाशी कार्यरत राहिले आहेत. युवकांमध्ये हिंदुत्व जागृती, व्यसनमुक्ती, सामाजिक ऐक्य, धार्मिक उत्सवांमध्ये शिस्तबद्ध व्यवस्थापन यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ची जबाबदारी सांभाळत अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यतत्परतेची व नेतृत्वगुणांची दखल घेत बजरंग दलाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
गाढवे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दलाची संघटनात्मक ताकद अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल अणदूर परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते राजकुमार गाढवे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत






