spot_img
spot_img
spot_img

तथागत गौतम बुध्दांचा धम्म मानवाला आनंदायी जीवन जगण्याची शिकवण देतो : – 

*भदन्त शासन मेत्ता*  

———————————————

वागदरी ता तुळजापूर येथे वर्षावास निमित्ताने धम्म प्रवचन संपन्न 

——————————————-

नळदुर्ग  दादासाहेब बनसोडे 

सबंध मानव जातीला कर्मकांड व अंधश्रद्धा मुक्त निरोगी आणि आनंददायी जिवन जगण्याची शिकवण तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा बौद्ध धम्मा मधुन मिळते म्हणूनच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी नागपूर येथिल दिक्षा भुमीवर बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन सुखी समाधानाने आनंदी जिवान जगण्यासाठी व आपल्या सर्वांगीण विकासाकरिता बौद्ध धम्माचा आणि शिक्षणाचा मार्ग दाखविला आहे.तेंव्हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून सर्व बहुजनानी पंचशीलाचे काटेकोर पणे पालन करून बौद्ध धम्माच्या मार्गाने जिवन व्यथित करावे असे अवाहान बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भिक्खू संघ नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रभारी भंते माता शासन मेत्ता (भिक्कूनी) यानी वागदरी ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

वर्षावास निमित्ताने बौध्द धम्म प्रसार व प्रचार अभियान नळदुर्ग सर्कल – २०२५ अंतर्गत वागदरी ता. तुळजापूर येथे बुद्ध वंदना व धम्म देसना (प्रवचन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंते माता शासन मेत्ता बोलत होत्या या प्रसंगी भंते विश्वमित्रा (भिक्कूनी) यांची धम्म देशना झाली.

प्रारंभी भंते शासन मेत्ता,भंते विश्वमित्रा व उपासिका स्वाती संतराम गायकवाड यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यानी केले.

या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते दत्तू वाघमारे , संदीपान वाघमारे,अनिल वाघमारे, शिवाजी वाघमारे,महादेव वाघमारे, सुर्यकांत वाघमारे,दिपक वाघमारे,लक्ष्मण झेंडारे, माजी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे,कविता गायकवाड, उज्वला वाघमारे, श्रीदेवी वाघमारे,रेखाबाई झेंडारे, गीताबाई झेंडारे, कमलबाई धाडवे, शकुंतलाबाई वाघमारे, वंदना वाघमारे, सुगंधा वाघमारे, सह महिला,यूवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या