नाभिक समाज हा गरीब आणि प्रामाणिक आहे
———————————————-
नळदुर्ग प्रतिनिधी.दादासाहेब बनसोडे
घेता नाम विठोबाचे , पर्वत जळती पापांचे , ऐसा नामाचा महिमा , वेद शिणला झाली सिमा मानवाच्या कल्याणासाठी समतावादी विचार सांगण्यासाठी विठोबा रायाचे नामस्मरण करण गरजचे आहे . आयुष्यातील पाप दुर्गंधी नष्ठ झाली पाहिजे आणि समता बंधु भावाचा विचार रुजविणाऱ्या संत सेना महाराजांचे विचार डोळ्या समोर ठेऊन आपण मार्गक्रमण करावे कारण नाभिक समाज गरीब आहे पण प्रामाणिक आहे श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज शिवा काशिद जिवा महाल हे नाभिक समाजाचे श्रद्धास्थान मानले जाते या सर्वांचा विचार करता नाभिक समाजाला खुप मोठा इतिहास आहे आसे परखड मत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी केले .
नुकतेच नळदुर्ग शहरात श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत विस्तार अधिकारी शिक्षण विभाग बाळासाहेब महाबोले यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार विलास येडगे नाभिक समाजाचे प्रमुख सल्लगार उद्धव सुरवसे हे होते तर कार्यक्रमास पत्रकार उत्तम बनजगोळे नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे माजी नगरसेवक सुधिर भैया हजारे, पत्रकार दादासाहेब बनसोडे इरफान काझी , आयुब शेख आदिजन उपस्थित होते . आलेल्या सर्व पाहुण्याचे व मान्यवरांचे स्वागत पर सत्कार करण्यात आला या वेळी ह भ प शिवचरित्रकार देवाची आळंदी तेजश्रीताई खटके यांचे किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील मान्यवर पत्रकार सेवानिवृत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नाभिक समाजाचे शहर उपाध्यक्ष नेताजी महाबोले यांनी केले
संदीप सुरवसे,महादेव माने, गोवर्धन आतकरे नागनाथ वाळके विशाल सुरवसे, शिवराज पवार, समिर सुरवसे, नेताजी महाबोले ,हनुमंत हिलाळ, बाळासाहेब महाबोले, सुभाष महाबोले, शिवाजी महाबोले, सहदेव माने, भगवान माने,श्रीकांत आतकरे, अदिनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले . किर्तनास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .






