वागदरी (एस.के.गायकवाड ):
सरपंच,उपसपंच ग्रा.प.सदस्या सह गावातील सर्व ग्रामस्थानी गावच्या विकासात्मक कामासाठी एक मेकांनाचा विश्वास संपाद करून काम केल्यास गावच्या विकासाला चालना मिळते तेंव्हा विकास कामाकरिता सर्वानी एकत्र येवून काम करणे काळीची गरज आहे तसेच मानवाच्या सर्वांगीन विकासाकरिता शिक्षणाची गरज आहे. तेंव्हा प्रत्येकानी गावच्या शाळेकडे ही लक्ष देणे महत्वाचे आहे.असे प्रतिपादन रिपाइं (आठवले) चे नळदुर्ग शहराध्यक्ष तथा डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूल नळदुर्ग चे संस्थापक मारूती खावरे यानी नंदगाव तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
नंदगाव ग्राम पंचायतीच्या नुतन प्रभारी सरपंच पदी ग्रा.प. सदस्य शशिकांत बळीराम नागीले यांची नुकतय बिनविरोध निवड झाल्या बदल त्यांचा मित्र परिवारांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुल नळदुर्ग चे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा महाराज बेरोजगार संस्थेचे संस्थापक सचिव संदीप अगरवाल, ग्रामपंचायत सदस्य कोमल काटे,नंदाबाई कामशेट्टी, मिनाक्षी मोरे,धनराज कलशेट्टी, व्हा चेरमन मोहन मोरे,युवा नेते सचिन कोरे, सिद्धाराम जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मारुती खारवे बोलत होते.
प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून नुतन सरपंच शशिकांत नागीले यांचा मारूती खारवे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत यथोचित सात्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार तथा रिपाइं (आठवले) तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.के. गायकवाड यानी केले तर आभार दलित पॅथर जिल्हा संपर्क प्रमुख शाम नागिले यानी मानले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी राहुल कांबळे,बसवराज कोरे, नागू करंडे,डॉ कलकोटे,विशाल मुकदान, चंद्रकांत शिंदे,विठ्ठल घोडके,रोहिदास कांबळे,विकास सोनकांबळे,मरगु सुरवसे, सिताराम मूकदान,नितीन सुरवसे, महादेव माने,अनिल भालेराव, गुंडू कांबळे,विजय कांबळे,संतोष सोनकांबळे,विनायक नागिले,बुद्धा नागिले, नागनाथ बनसोडे, सुधाकर नागिले, अनिल बनसोडे,परमेश्वर चिनगुंडे,अनिरुद्ध कुलकर्णी,नंदकुमार गायकवाड, अप्पू कोरे, महादेव नागिले,दगडू लोखंडे,सविता शिंदे,संगीता जाधव,सविता मुकदान,जयश्री नागिले, भारताबाई मूकदान, पूनम लोखंडे, सविता अगरवाल, आदी, सह बौद्ध उपासक,उपसिका ,बाल-बालिका ,महिला, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.






