spot_img
spot_img
spot_img

उत्कृष्ठ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या निर्मला भालेराव यांना आरोग्य विभागाची पदोन्नती 

नळदुर्ग येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने निर्मला भालेराव यांचा निरोप समारंभ संपन्न 

———————————————-

नळदुर्ग प्रतिनिधी.दादासाहेब बनसोडे 

संतुलित समृद्ध जीवनशैली असणं म्हणजे मानसिक आरोग्य आसे म्हणता येईल कारण मन शरीर मेंदू हे तिन्ही अवयव निगडीत आसल्या मुळे या तिघांत संतुलन असणं खुप गरजेचं आहे निर्मला भालेराव परखड आहेत पण आरोग्य विभागात जेवढाच जिव्हाळा आहे आरोग्य विभागाची नाळ जुळलेली आहे प्रत्येक रुग्णाची काळजी घेणे , हक्काने विचारणे , त्या आजारावर निदान करणे नातेवाईकाशी आपुलकी निर्माण करणे हे सारं जमत खुप चांगल्या पद्धतीने ते आरोग्य विभागासाठी धावपळ करीत आसतात मानवाच्या आरोग्या विषयी समस्या सोडविणे , रुग्णाना मानसिक दृष्ट्या सक्षम राहाण्यासाठी सल्ला देणे , आपण आपले कार्य सुव्यवस्थित ठेवणे हा त्यांचा ध्यास होता त्या मुळेच शासनाने

परिसेविका अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे आसे परखड मत नळदुर्ग येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ चंचला बोडके यांनी व्यक्त केले .

नुकताच नळदुर्ग येथे निर्मला भालेराव यांना पदोन्नती मिळाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रमुख म्हणून बोलत होत्या निर्मला भालेराव ह्या गेल्या २५ वर्ष धाराशिव येथे जिल्हा रुग्णालयात , तुळजापूर येथे ग्रामीण रुग्णालय , व नळदुर्ग येथे उप जिल्हा रुग्णालय आरोग्य विभागात अधिपरिचारिका म्हणून उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे त्यामुळे भालेराव यांची परिसेविका अधिकारी म्हणून धाराशिव सिव्हील येथे इंचार्ज म्हणून नेमणूक केली आहे .

डॉ सुरेंद्र मडके वैद्यकिय अधिकारी , डॉ अभिजित बागल , डॉ नरसिंह जोशी , डॉ मंजिरी शिनगारे , उप जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधिक्षक धरणे ,आरोग्य विभागाचे कर्मचारी राजेंद्र प्रकाश पवार , एक्सरे विभागाचे संतोष कांबळे , उमाकांत डिगे लॅब असिस्टंट , शितल चिलोबा लॅब असिस्टंट , निर्मला तोडकरी परिसेविका आरोग्य कर्मचारी शायन काझी ,अदिजनानी

निर्मला भालेराव यांचा पदोन्नती मिळाल्यामुळे खुप मोठा सत्कार करण्यात आला . यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड यांनी ही शाल बुके देऊन पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शामलताई भालेराव , कोमलताई भालेराव , मंगलताई भालेराव , अमोल भालेराव , प्रविण जाधव , साहील मुल्ला , सुमित गायकवाड ,शिवाजी गायकवाड डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह येथील कर्मचारी शिंदे , सामाजिक कार्यकर्ते माने पत्रकार दादासाहेव बनसोडे नंदा सुरवसे , यांच्या सह अनेक नागरिक उपस्थित होते .

सत्काराला उत्तर देताना २५ वर्षाच्या कालावधीतील आठवणी जाग्या झाल्या आनू आश्रू गहिवरले आणि भावनिक झाल्या .

Related Articles

ताज्या बातम्या