———————————————- दोन प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोर अश्लिल भाषेत शिविगाळ करत एक – मेकाची गचांडी पकडली
———————————————-
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात दि. 29 ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या कारणावरून दोन प्राध्यापकांमध्ये भांडण झाले. यावेळी या प्राध्यापकांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत एकमेकांची गचांडी धरली. प्राध्यापकांचा हा तमाशा विद्यार्थ्यांसमोर सुरु होता.अशा अश्लील भाषेत महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर शिवीगाळ करणाऱ्या प्राध्यापकांवर बालाघाट शिक्षण संस्था कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे .
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आहे. बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हे काँग्रेसचे जेष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे आहेत. या महाविद्यालयात नळदुर्ग शहर व ग्रामिण भागातील विद्यार्थी खुप मोठया प्रमाणात शिक्षण घेत आसतात बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, कै. शिवाजीराव पाटील बाभळगावकर, कै. आलुरे गुरुजी व कै. नरेंद्र बोरगावकर या चार नेत्यांनी या कॉलेजची धुरा सांभाळली होती. या चारही नेत्यांनी विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन काम केले आहे.
परंतू तेथील प्राध्यापकानी या चौघा विषयी काय केले स्वतः परिक्षण करावं
दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयामध्ये पतसंस्थेच्या कारणावरून विद्यार्थ्यांसमोर दोन प्राध्यापकांमध्ये कडाक्याचे भांडण झाले यावेळी या दोन्ही प्राध्यापकांनी अतिशय खालच्या पातळीवर एकमेकांना शिवीगाळ करत एकमेकांची गचांडी धरली. या प्राध्यपाकांचा हा तमाशा विद्यार्थ्यांसमोर सुरु होता. ते विद्यार्थानी काय आदर्श घ्यावा ही परिस्थिती निर्माण झाली आहे . ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न तर करावा परंतू आशा संस्थेची आब्रु वेशीवर टांगणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करावी
सध्या महाविद्यालयात पदवीच्या परीक्षा सुरु आहेत त्यामुळे विद्यार्थी मोठया संख्येने महाविद्यालयात उपस्थित होते. त्यांच्यासमोर या प्राध्यापकांनी हे निंदनीय कृत्य केले असुन विद्यार्थ्यांसमोर अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या या प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावे?
या घटनेबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांना विचारले असता त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे .
आगर बालाघाट शिक्षण संस्था संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग कॉलजची बदनामी करणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई नाही झाल्यास या ठिकाणी मोठे आंदोलन करावे लागणार आहे अशा प्रकारचे निवेदन नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे यांनी संबंधित कॉलेजचे प्राचार्य सुभाष राठोड यांच्याकडे देण्यात आले आहे






