जळकोट (अरुण लोखंडे):
परिवर्तन मिशन फाउंडेशन पुणे च्या माध्यतून परकीय भाषा व त्या मधील जागतिक करिअर च्या संधी हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमा अंतर्गत जपानी भाषा परिक्षेत बसविण्यात आलेल्या विद्यार्थ्या पैकी पाच विद्यार्थ्यानी या परिक्षेत उत्तिर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
ग्रामीण भागातील तरूणाना परकीय भाषा व त्या मधील जागतिक करिअर च्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशान परिवर्तन मिशन फाउंडेशन पुणे हे काम करत असून त्यांचा एक उपक्रम म्हणजे जपानी भाषा JLPT(Japanese Language Proficiency Test) या परिक्षेची पूर्व तयारी करून तरुणाना या परिक्षेत बसविले जाते.नुकतच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेत परिवर्तन मिशन फाउंडेशनच्या पाच (५) विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे.
या मध्ये सिद्धार्थ गायकवाड, पुजा सौदागर, विपश्यना गावंडे, जान्हवी दांडगे, सम्यक गोपनारायण हे पाच विद्यार्थी आहेत.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हे ग्रामीण भागातील विद्यार्थी जपान मध्ये शिक्षण व नोकरी करू शकतात.परिवर्तन मिशन फाऊंडेशन चे संस्थापक किशोर भगत यांनी व मित्र परिवारानी या पाच ही उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे आभिनंदन केले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या जागतिक संधीचा फायदा करून घ्यावा असे आवाहन फाऊंडेशन चे संस्थापक किशोर भगत यानी केले आहे.
परिवर्तन मिशन फाऊंडेशन च्या या उपक्रमामुळे अनेक जागतिक संधी व माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे.
ग्रामीण परिसरातील चार विद्यार्थी आज जागतिक स्तरावर आपली छाप उमटवत आहेत. 
अधिक माहितीसाठी व मोफत परदेशी भाषा प्रशिक्षणासाठी भेट द्या :
www.parivattan.org






