वागदरी (एस.के. गायकवाड):
बोळेगाव ता.तुळजापूर येथे
श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या गणेश मुर्तीचे सातव्या दिवसी वाजात गाजत मोठ्या उत्साही वातावरणात विसर्जण करून “गणती बाप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करित गणरायाला निरोप देण्यात आला.
तुळजापूर तालूक्यातील मौजे बोळेगाव येथे एक गाव एक गणती हा उपक्रम राबवित येथिल श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेश चतुर्थीला गावातील मुख्य चौकात गणेश मुर्तीची स्थापना करून विविध उपक्रमाने गणेश उत्सव साजरा करण्यात आला.
सात दिवसाच्या कालावधिमध्ये दररोज सकाळ संध्याकाळ गावातील प्रातिष्ठीत मान्यवरांच्या हस्ते आरती करून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आले.गणेश उत्सव निमित्तने महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.
शेवटी सातव्या दिवसी सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते गावातील मान्यवारांच्या प्रमुख उपस्थित गणेश मुर्तीचे पूजन व आरती करून सहवाद्द भव्य विसर्जन मीरवणूक काढून गणरायाला निरोप देण्यात आला. या प्रसंगी लहान मुला मुलींनी विविध गाण्यावर सुंदर नृत्य सादर करून ग्रामस्थ भाविकभक्तांची मने जिंकली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भावेश लिंबाजी मदने, अमर रुपनूर,राजेंद्र रूपनूर,अभिषक सुर्यवंशी, गौरव सुर्यवंशी, श्रीमंत सुतार, परमेश्वर पोतदार,गणेश गायकवाड,चिमाजी रुपनूर, संगीता सुरवसे सह ग्रामस्थ महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतो.






