spot_img
spot_img
spot_img

श्री कुलस्वामिनी आश्रमशाळेत “शिक्षक दिन” साजरा

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी श्री कुलस्वामिनी प्राथमिक, माध्यमिक व राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जळकोट येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती “शिक्षक दिन” उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोटचे सचिव तथा प्राचार्य संतोष चव्हाण साहेब प्रमुख अतिथी श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आशा पवार मॅडम व इंदिरा गांधी आदर्श माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विनायक राठोड सर,इंदिरा गांधी आदर्श माध्यमिक आश्रम शाळेचे सहशिक्षक उमाकांत माळी सर श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव सर उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोटच्या वतीने संस्थेचे सचिव आदरणीय संतोष चव्हाण साहेब यांनी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. 1998 च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद पांढरे सरांनी केले.विद्यालयातील विद्यार्थी शिक्षका बद्दल आपल्या भावना व्यक्त केले या कार्यक्रमात माजी विद्यार्थी अनिल चव्हाण, उमाकांत माळी, मुख्याध्यापक विनायक राठोड सर, तसेच प्राचार्य संतोष चव्हाण साहेब यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले.

यावेळी प्राथमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्रीमती शांताबाई चौगुले मॅडम, श्रीमती मिरा पवार मॅडम, महाविद्यालयाचे प्रा ज्योतिका चव्हाण मॅडम, प्रा सुरेश कोकाटे सर, प्रा अश्विनी लबडे ,प्रा संतोष दुधभाते सर ,प्रा अप्पासाहेब साबळे सर, माध्यमिक आश्रम शाळेचे सहशिक्षक बिळेणसिध्द हक्के सर, बाळासाहेब मुखम सर,कल्पना लवंद मॅडम, कुमारी मयुरी कांबळे मॅडम, ,दुर्गेश कदम सर,शंकर चव्हाण, अमित खारे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन देवानंद पांढरे सर श्री खंडेराव कारले सर व श्रीमती प्रा प्रमिला कुंचगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नेहा राठोड व कुमारी मोनिका चव्हाण तर आभार किरण कांबळे सरांनी मानले. या कार्यक्रमाला अलियाबाद तांडा रामतीर्थ तांडा येथील माजी विद्यार्थी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या