जळकोट (अरुण लोखंडे) माझ्या वडीलाने व आईने आम्हा भावंडावर छत्रपत्ती शिवाजी महाराज माहात्मा ज्योतीबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादाची विचारांचे अनुकरण केल्यास जीवनात सतत यश संपादन होते हे बाळकडू आम्हाला दिले म्हणुनच मी आज शिक्षक म्हणुन स्वाभिमाने काम करतो असे प्रतिपादन समीर जाधव सर यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले .
कार्यक्रमांच्या सुरुवातीस भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले . त्यानंतर बोरमतांडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत कार्यरत असलेले समीर जाधव सर यांनी प्राध्यापक पात्रता परिक्षा ( सेट ) हे पहिल्याच प्रत्यनात ऊर्तीण झाल्याबदल भारताचे राष्ट्रपत्ती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जंयती तथा शिक्षक दिनाचे अविचीत्य साधून त्याचा पत्रकार अरुण लोखंडे यांच्या हस्ते शाल फेटा पुष्पहार आणि भारतीय संविधानाचे पुस्तक देवून सत्कार करण्यात आला. त्याचबरोवर अंगणवाडी ताई कोमल माने याचाही शाल पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला
पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनाही ही आपल्या जीवनात सात्यत पूर्ण जर आपण आभ्यास केलो तर यश हमखास मिळते त्यासाठी प्रामाणिक पणा महत्वाचा आहे माणुस आयुष्यभर विद्यार्थ्यी असतो त्याचे कारण आपले आदर्श डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शेवटच्या श्वासापर्यत आभ्यास करत राहीले त्यांनी जगतल्या सर्व पदव्या गृहण केले आणि जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान या देशाला अर्पण केले म्हणुन तुम्ही आम्ही सर्वजन सन्मानाचे आणि स्वाभिमानाचे जीवन जगत आहोत हे विसरता कामा नये असे ते म्हणाले .
सदर कार्यक्रमास रमाई महिला मंडळाच्या ज्योती लोखंडे नगिना लोखंडे वनिता लोखंडे जया माने सपना गायकवाड मनिषा गायकवाड कु अंजली लोखंडे श्रुत्ती भालेराव श्वेता गायकवाड पुजा गायकवाड अर्पिता लोखंडे तसेच युगपुरुष तरुण मंडळाचे अरविंद लोखंडे सायबा लोखंडे यशवंत लोखंडे अर्थव लोखंडे निखील साखरे शुभम पासोडे रोहीत माने स्वप्नील लोखंडे प्रतिक भंडारे अभिमन्यू लोखंडे बबूवान सोनकांबळे सह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वेदांत नंदकुमार गायकवाड या विद्यार्थ्याचा पण जन्मदिवस साजरा करण्यात आला . कार्यक्रमांचे प्रास्ताविक अरुण लोखंडे यांनी केले तर आभार सतिश माने यानी मानले






