भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून देशाचे सामाजिक न्याय व आधिकारीता राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनांदोलनातून सबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर अनेक खंभीर नेते व कार्यकर्ते उदयास आलेले आहेत. त्या पैकीच धाराशिव जिल्ह्यातून उदयास आलेले रिपाइंचे खंभीर नेतृत्व म्हणजेच रिपाइं (आठवले)चे महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी मा.राजाभाऊ ओव्हाळ होय. ज्यांची ओळख रिपाइं (आठवले) पक्षाचा धाराशिव जिल्ह्यातील ढाण्या वाघ म्हणून आहे.
राजाभाऊ ओव्हाळ हे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) च्या नामांतर लढ्यात पँथरच्या वादळी आंदोलनात तावून सुलाखून निधालेला कार्यकर्ता होय.नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर नामांतर,झोपडपट्टी पुनर्वसन,गायराण जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणे,भूमीक्ती आंदोलन, महागाई निर्देशांका नुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करणे,दलित मागासवर्गीयावर होणार्या अन्याय अत्याचार विरोधी आंदोलनासह विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नावर वेळोवेळी आज तागायात आयोजित मोर्चे, निदर्शने आंदोलनात धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व त्यानी केले आहे करित आहेत.मध्यंतरीच्या कालखंडात उस्मानाबाद (धाराशिव) न.प.चे नगरसेवक म्हणून समाजाचे प्रतिनिधित्व करत असताना अनेक विकासात्मक कामे केली आहेत. विशेष म्हणजे धाराशिव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा यासाठी कार्यकर्त्यासह संघर्ष करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभाराही पर्यंत शासनाकडे पाठपुरावा केला. हे त्यांचे अविस्मर्णीय कार्य आहे.
दलित पँथर ते रिपाइं असा एकनिष्ठ प्रवास त्यांचा चालू आहे.आपल्या उभ्या आयुष्यात तसूभरही इकडे तिकडे न करता एक नेतृत्व-एक पक्ष-एक झेंडा या त्रिसुत्रासी एक निष्ठ राहून नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वा खाली रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सामाजिक,राजकीय चळवळीत सक्रिय आहेत.त्यांच्या एकनिष्ठ कार्याची दखल घेवून पक्ष श्रेष्ठीने त्यांची रिपाइंच्या महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी पदी निवड केली आहे.ही एक आभिनंदनिय बाबा आहे.आज दि.७ सप्टेंबर त्यांचा ६४ वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
—————==————–
एस.के. गायकवाड
मु.पो. वागदरी ता.तुळजापूर
मो.न.९३७००४०२०३
(लेखक रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते आहेत)






