spot_img
spot_img
spot_img

रिपाइं (गवई) जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ लोंढे 

वागदरी ( प्रतिनिधी ):

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आणि डॉ.राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी येडोळा तालुका तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आणि गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या सत्तेत रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते संसद पट्टू दिवंगत रा.सु. गवई यांच्या विचाराचा आणि नेतृत्वाचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या माध्यमातून येडोळा ता.तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ लोंढे यांनी गेल्या अनेक वर्षापासून रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ राहून बहुजन समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करीत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन रिपाइंचे राष्ट्रीय सर चिणीस डॉ.राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार पक्षाचे महाराष्टू निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.गौतम गोस्वामी यानी त्याना मुंबई येथे सदर निवडीचे पत्र दिले आहे.

त्यांच्या या सार्थ निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र आभिनंदन होत आहे

Related Articles

ताज्या बातम्या