धाराशिव दि.16 सप्टेंबर 2025
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत हर्षवर्धन बारवकर याच्या तात्काळ अटकेची आणि कठोर कारवाईची मागणी केली.
बारवकर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिन खरात यांच्याविषयी सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह, अपमानास्पद व मानहानीकारक विधाने करून समाजात तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. या गंभीर प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन समाजात असंतोष पसरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
पक्षाच्या ठाम मागण्या
1.हर्षवर्धन बारवकर यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी.
2.पक्षाध्यक्ष मा. सचिन खरात यांना त्वरित पोलिस संरक्षण द्यावे.
3.असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून शासनाने कडक उपाययोजना कराव्यात.
मा.निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी निवेदन स्वीकारून राज्याचे मा.मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष संपत सरवदे, कास्टट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्य अतिरिक्त महासचिव हरिभाऊ बनसोडे, बापूराव गायकवाड,मोहन सुरवसे, साहेबराव गायकवाड,नवनाथ वाळवे, उद्धव गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
रिपब्लिकन पार्टीने इशारा दिला की, शासनाने तातडीने कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल पुढील संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.






