आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर : विजय पिसे जळकोट
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत जळकोट येथे
जिल्हा परिषद प्रशाला जळकोट येथील विद्यार्थीप्रिय,अभ्यासू कर्तव्यदक्ष शिक्षका, पुष्पलता सिद्राम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सरोजनी मोहन सुरवसे सेवानिवृत्त अंगणवाडी ताई यांच्याकडून
, वाढदिवसानिमित यांनी शाल, पुष्पगुच्छ ट्रे देऊन सत्कार करण्यात आला.
पुष्पलता कांबळे या विद्यार्थ्यांमध्ये अष्टपैलू नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य करतात. किशोरवयीन मुलींचे शिक्षण, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण बालविवाह प्रतिबंधक नाटिका, विद्यार्थ्यांचे आरोग्य, याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी त्या सतत प्रयत्न करतात.
कार्यक्रम प्रसंगी गावचे सरपंच गजेंद्र कदम, माजी सरपंच अशोक पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विजय पिसे, पत्रकार मेघराज किलजे, तंटामुक्ती अध्यक्ष शिक्षणप्रेमी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर्स ,शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी,माजी सैनिक, अंगणवाडी ताई ,आशा कार्यकर्ती, मदतनीस सर्वजण उपस्थित होते.






