आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन श्री कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जळकोट ता.तुळजापूर येथे विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथमत: गावातून प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोट चे सचिव तथा प्राचार्य संतोष चव्हाण साहेब प्रमुख पाहुणे म्हणून श्री कुलस्वामिनी प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय आशा पवार मॅडम माध्यमिक आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव सर श्री खंडेराव कारले सर, व प्रा.ज्योतीका चव्हाण मॅडम यांची उपस्थिती लाभली.
नंतर शाळेच्या प्रांगणात प्राचार्य श्री संतोष चव्हाण साहेब व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, घोष वाक्य,प्रश्नमंजुषा व चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. एक पेड माॅ के नाम या अभियान उपक्रमामध्ये प्राचार्य, शिक्षक, व विद्यार्थी समवेत वृक्षरोपण केले.
याप्रसंगी गावातील सन्माननीय मान्यवर सरपंच, उपसरपंच , पोलिस पाटील,आजी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष व पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी, चेअरमन व पदाधिकारी,प्रशाला मुख्याध्यापक,प्रतिष्ठित नागरीक,पालक वर्ग,पालक माता भगिनी यांची उपस्थिती लाभली.
शेवटी मान्यवरांचे मार्गदर्शनपर मनोगतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पासाहेब साबळे सर,देवानंद पांढरे सर व किरण कांबळे सर,किरण ढोले सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन प्रा.सुरेश कोकाटे सर तर आभार बिळेणसिध्द हक्के सर यांनी मानले.अशा प्रकारे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.






