वागदरी (एस.के.गायकवाड):
बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी बुद्ध विहारातील हिंदू पुरोहितांचा कब्जा हटवून त्या ठिकाणी बौद्ध धम्म गुरु भिकूंच्या ताब्यात ते विहार द्यावे या मागणीसाठी धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सखल बौद्ध बांधवांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार बौध्दाच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागणीसाठी दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव च्या वतीने आयोजित या जन अक्रोष मोर्चा मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले),वंचित बहुजन आघाडी,दलित पॅंथर सह जिल्ह्यातील विविध पक्ष संस्था संघटना व सखल बौध्द बांधव सहभागी झाले होते.
धाराशिव येथील क्रांती चौकातून या प्रचंड जन आक्रोश मोर्चास सुरुवात झाली झाली. क्रांती चौक ते येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही आश्वरूढ पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा थेट धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.या प्रसंगी भंते सुमंगल यानी उपस्थित मोर्चेकरूना त्रिशरण पंचशील दिले.अर्थात सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली
यावेळी बोलाताना प्रत्येकानी जोरदार मागणी केली की ज्याप्रमाणे या देशातील हिंदू मंदिरे,हिंदू धर्मगुरुच्या ताब्यात आहेत,मुस्लिम मजिदीमध्ये मुस्लिम धर्मगुरुचा ताबा आहे. ख्रिश्चन मंदिरात (चर्च) ख्रिश्चन धर्मगुरूचा ताबा आहे. त्याचप्रमाणे या देशातीलच नव्हे तर सबंध जगातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी विहारांमध्ये हिन्दु पुरोहिताचे काय काम? असा खडा सवाल उपस्थित करून बुध्दगया महाबोध्दी बुध्दविहारत बौद्ध धम्मगुरूंचा भिक्खूंचा ताबा असला पाहिजे तेंव्हा सन १९४९ कायदा रद करून या बुद्धगया महाबोधी बुद्ध विहारातील हिंदू पूरोहितांचा ताबा काढून हे विहार पूर्णतःबौद्धांच्या ताब्यात द्या असी मागणी रिपाइं (आठवले)चे प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओव्हाळ, वंचित बहुजन अघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रणित डिकले, सुधीर कांबळे,भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम आदीनी या मोर्चाला संबोधित करताना केली. या सभेचे सुत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे यानी केले तर उपस्थित मान्यवरांचे व सहभागी मोर्चेकरांचे अभार भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष अँड.दिपक निकाळजे यानी मानले.
यावेळी रिपाइं चे प्रदेश सचिव संजय बनसोडे, वंचित बहुजन महिला अघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अनुराधा लोखंडे, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे, मिलींद रोकडे, भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र निकाळजे, गुणवंत सोनवने, विश्वास भाऊ पांडागळे, बाळासाहेब बागडे गुरुजी,दादासाहेब बनसोडे, सोमनाथ गायकवाड, बाबासाहेब मस्के,मुन्ना ओव्हाळ,दादासाहेब बनसोडे, एस.के. गायकवाड,सह जिल्हयातील सर्व समता सैनिक दलातील सैनिक, उमरगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, कळंब, भूम, परंडा, वाशी आदी तालूक्यातील बौध्द उपासक, उपाशिका युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






