बौद्ध नागरीकांची न्यायासाठी वज्रमुठ
बौद्धांचा जिल्ह्याधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा
नळदुर्ग प्रतिनिधी दादासाहेब बनसोडे
तथागत भगवान गौतम बुद्ध याना ज्ञान प्राप्ती झाली यूनोस्केने संरक्षीत केलेले जागतीक बौद्धाचे ठिकाण बौद्धगया बौद्धांचे महाबोधी विहार हे संपूर्ण बौद्धाना नियमन करणे साठी बौध्द धम्म म्हणजे संपूर्ण जगाला समतेचा संदेश दिला जातो ते सर्व मनुवादी व्यवस्था कार्यरत आहे या वृत्तीला खतपाणी न घालता देशातली सर्वच बौद्ध विहारे महाविहार हे फक्त बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे नाहीतर आम्ही राज्य व्यापी देशव्यापी आंदोलन छेडु आणि सरकारला देण्यास भाग पाडु
आसा कनखर इशारा भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई कदम यांनी केला आहे .
धाराशिव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्व बौद्ध एकत्र ऐऊन एल्गार केला जगातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगया बौद्ध महाविहारा मध्ये हिंदु पुरोहिताचे काय काम आसा खडा सवाल उपस्थित करून बुद्धगया महाबोधी विहारात बौद्ध धर्मगुरुचा ताबा आसायला हवा भारत बौद्ध भुमीतील सर्व बौद्ध विहारे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा समतावादी विचाराने संबंध भारत देश समानतेची वाटचाल सुरू आहे वानुवादी विचाराने बौद्ध विहारामध्ये थैमान घातले आहे या मनुवादी विचारांचा बिमोड करण्या करिता बौद्धांची वज्रमुठ तयार झाली आहे . धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुके विविध संघटना , अनेक पक्ष , अनेक संस्था या भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते बौद्धांचे मुख्य स्थळे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या करिता हा जन आक्रोश मोची भिमनगर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भरमसाठ बौद्ध अनुयायी दाखल झाले होते . अनेक मागण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आशा प्रकारची मागणी रिपाई चे प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ , वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रणित डिकले , सुधिर कांबळे , भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्रकुमार निकाळजे , ॲड दिलीप निकाळजे , रिपाईचे प्रदेश सचिव संजय बनसोडे ,वंचितच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे , वंचितचे नेते मिलींद रोकडे , जिवन कदम , बौद्धाचार्य गुणवंत सोनवणे , पर्यटन विभाग उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे , कोषाध्यक्ष कुमार ढेपे , विजयमाला धावारे ,संतोष सुरवसे सह जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्ये उपस्थित होत्या मोर्चाचे नेतृत्व व सुत्र संचालन जिल्हा सर चिटणीस विजय बनसोडे यांनी केले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते आणि खुप चांगल्या पद्धतीने संरक्षण केले .






