नंदगाव (शाम नागिले ) तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी नंदगाव गावाचे सरपंच शशिकांत बळीराम नागिले यांच्या हस्ते प्रमिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले .
या बाबत सविस्तर असे की भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला परंतु मराठवाडा हा 17 सप्टेंबर 1948 मध्ये मध्ये हैद्राबाद संस्थांन निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन मराठवाडा भारतामध्ये सामील झाल्याची आठवण करून देतो.या दिवशी तिरंगा फडकावला जातो आणि मराठवाड्याशी संबधित सामाजिक व संस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.भारत स्वतंत्र झाला तरी मराठवाडा हैद्राबाद संस्थांनाचा भाग होता त्यामुळे मराठवाड्याच्या जनतेला हैद्राबादच्या निजामाविरुद्ध स्वतंत्र्य मिळविण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला.म्हणून 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.याचा एक भाग म्हणून नंदगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळा,प्राथमिक शाळा,हुतात्मा स्मारक व ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरा करण्यात आला . या वेळी ग्रामपंचायत अधिकारी राहुल कांबळे ,मा.पंचायत समिति सदस्य तथा कृषि बाजार समिती सदस्य सिद्धेश्वर कोरे, ग्रामपंचायत सदस्य कमलबाई काटे ,धंनराज कलशेट्टी ,सतीश काटे,प्रशांत येणेगुरे ,सतीश बशेट्टी ,दशरथ काटे सर ,सचिन कोरे ,भीमराव चिनगुंडे,विश्वजित घंटे,मल्लिनाथ गुड्डे,तंटामुक्तअध्यक्ष मल्लू पाटील,धर्मराव तुप्पे ,परमेश्वर चिनगुंडे पत्रकार तथा दलित पॅंथर जिल्हा संपर्क प्रमुख शाम नागिले,शंकर सुरवसे ,करंडे गुरुजी ,आशा कार्यकर्त्या गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला,शाळेतील मुले,मुली शिक्षक,तरुण वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.






