(मुरूम महसूल मंडळाचा २०२४ खरीप पिकाचे अनुदान मंजूर करा )
आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
उमरगा तालुक्यात सण २०२५ मध्ये सर्वत्र अतिवृष्टी जन्य पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी आसमानी संकटात अडकले आहेत, काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे,तालुक्यातील असंख्य शेतकऱ्याचे खरीप पिके पाण्यात आहेत, काही ठिकाणी पंचनामा करणेही शक्य नाही त्यामुळे उमरगा तालुक्यातील सर्व महसूल मंडळाचा अतिवृष्टी मध्ये समावेस करावा ही विनंती, त्याचबरोबर सण २०२४ खरीप हंगामातील सोयाबीन अतिवृष्टी अनुदानातून मुरूम मंडळाला वगळण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदाना पासून मुकावे लागले, तांत्रिक अडचणीचा बोजवरा शेतकऱ्यांवर ढकलून त्यांच्यावर अन्याय करू नका, मुरूम महसूल मंडळाचा सण २०२४ खरीप पिकांचा अतिवृष्टी मध्ये समावेश करून शेतकऱ्यांना अनुदान देऊन न्याय द्यावा अन्यथा बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल त्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे. वरील विषयावर गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्याल ही अपेक्षा..मुरूम महसूल मंडळाला वारंवार जाणूनबुजून वगळ्यात येते याकडे लक्ष द्याल ही अपेक्षा असे निवेदनात म्हंटले आहे.






