नळदुर्ग शहर युवाची दलित युवकाला प्रथमच संधी
नळदुर्ग प्रतिनिधी दादासाहेब बनसोडे
फुले शाहू आंबेडकर चळवळीतील व नळदुर्ग शहरातील उमलत निर्भिड
उज्वल नेतृत्व , सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्याची जाण आसणारे
धम्म कार्यात सतत कार्यरत राहून जनसेवा करत मानसाच्या मनाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारे अजयकुमार सदाशिवराव बागडे यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या नळदुर्ग शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
बागडे हे फुले , शाहु , आंबेडकर चळवळ गतीमान करण्यासाठी सतत आग्रेसर आसतात ते आपले वडिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिवराव बागडे यांच्या स्मरनार्थ अनेक कार्यक्रम घेऊन गरजू विद्यार्थांना शालेयपयोगी वस्तीचे वाटप करणे गरजूना मदत करणे अजयकुमार सदाशिवराव बागडे यांचा ध्यास आसतो व ते प्रामाणिक पणे काम करतात या सर्व गोष्टींचा विचार करून राष्ट्रीय कॉग्रेसच्या वरिष्ठनी नळदुर्गच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . यावेळी राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज भैया पाटील अमोल भैया कुतवळ , महाराष्ट्र किसान कॉग्रेसचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे नळदुर्ग शहराध्यक्ष आबेद कुरेशी ,
तालुका उपाध्यक्ष संदीप सुरवसे
संजय देशमुख , संजय कदम , बाळासाहेब सरडे , संतोष सोमवसे , विकास हावळे , आप्पा सोनवणे , सह कार्यकर्ते उपस्थित होते .
या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे .






