वागदरी (एस.के. गायकवाड):
अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका सह सर्व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
रिपाइं (आठवले) तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने देण्यात धाराशिव जिल्हाधिकारी यांना अप्पर तहसिलदार नळदुर्ग यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या पंधरा-वीस दिवसापासून धारा शिव जिल्ह्यातिल सर्व तालुक्यात सतत संततधार पाऊस येऊन अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात पाणी जाऊन खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून शेतमजुरांच्या हातालाही काम नाही.त्यामुळे भूमिहीन शेत मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे.तेव्हा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर सह सर्व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेत मजुरांना धान्य कीट व आर्थिक मदत द्यावी.तसेच गावोगावी घरांची पडझड झालेली आहे अतिवृष्टीमुळे अशा पडझड झालेल्या घरांची पाहणी करून त्या कुटुंबाला घराच्या दुरुस्तीसाठी शासनाने आर्थिक मदत करून त्यांचेआर्थिक व मानसिक पुनर्वसन करावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने अप्पर तहसिलदार नळदुर्ग मार्फत धाराशिव जिल्हा अधिकारी यांना करण्यात आली आहे.
नळदुर्ग येथील अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्या मार्फत धाराशिव जिल्हाधिकारी याना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइं (आठवले)चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,रिपाइं तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे,नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे, जेष्ठ कार्यकर्ते कैलास गुरुजी सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत






