आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
लोहारा तालुक्यातील भोसगा येथे दिनांक 30 सप्टेंबर वार मंगळवार रोजी हवामान बदल व पर्यावरण प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक मुकेश सोनकांबळे यांच्या माध्यमातुन रिसोर्स सपोर्ट सेंटर फॉर डेवलपमेंट मुंबई व असर सोशल एम्पॅक्ट ऍडवायजर यांच्या वतीने अतिवृष्टी ग्रस्त व पुरग्रस्त शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या रेशन किटचे वाटप ग्राम पंचायत कार्यालयात करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात मागच्या एक महिन्यापासून सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीमुळे व पुर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः कुजुन गेली असुन काही ठिकाणी तर जमीनच खरडून पुर्ण माती वाहुन गेली आहे. एवढेच नाही तर कित्येक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. परिसरातील अनेक घरांची पडझड होवुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरातील अन्य धान्य भिजुन सडले आहे. नदी काठी गोठे असलेल्या शेतकर्यांचे शेकडो जनावरे वाहुन गेली. आशा आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मानसिक आधाराबरोबरच मदतीचा हात देणे देखील महत्वाचे समजुन जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातुन त्यांना मायेचा हात देण्याचा प्रयत्न यावेळी कऱण्यात आला.
जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी जगला पाहिजे एवढच नाही तर कोणत्याही संकटात दोन हात करण्याची ताकद व बळ त्याच्यामध्ये यावं व हतबल न होता लढण्याची धमक प्रत्येक शेतकर्यांने ठेवावी, संघटना म्हणून आम्ही सर्वजण पुर्ण ताकदीने तुमच्या सोबत आहोत असे आव्हानही मुकेश सोनकांबळे यांनी केले. येणाऱ्या काळात ही मदत आणखी वाढवुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहचवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करु असेही ते म्हणाले.
यावेळी सरपंच व्यंकट कागे, ग्रामपंचायत अधिकारी एम के बनशेट्टी, माजी सरपंच राजाराम दासिमे, माजी उपसरपंच वैजीनाथ कागे, सामजिक कार्यकर्ते नेताजी पवार, यल्लालिंग एकुंडे, धनराज टेंगळे, कृषी अधिकारी नितीन चेंडकाळे, खंडागळे, ग्रा पं सदस्य आप्पाराव पाटील, कर्मचारी भीम बिराजदार यांच्यासह शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






