spot_img
spot_img
spot_img

भारतीय बौद्ध महासभेकडून बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहास मदत

वागदरी (एस. के. गायकवाड) : 

उमरगा जिल्हा धाराशिव येथील बहुजन हिताय विद्यार्थी वसतीगृह येथे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत असते. शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कौशल्य विकासासाठी सुद्धा वसतिगृह कार्यरत आहे. वस्तूगृहामध्ये नियमित आठवडी एनसीसी परेड चे आयोजन करण्यात येत असते. हा उपक्रम अधिक चांगला होण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा उमरगा च्या वतीने ढोल बैंड दान देण्यात आला.

धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोक विजयादशमी च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सदर मदत उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार माननीय प्रवीण स्वामी यांच्या हस्ते वस्तीगृहाचे अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी अनंत कांबळे संजीव कांबळे राजेंद्र सूर्यवंशी विद्याताई कांबळे प्राध्यापक आप्पाराव गायकवाड कैलास शिंदे हरीश डावरे विजय वाघमारे रामभाऊ गायकवाड आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. यां मदतीची विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी सहाय्य होईल अशा भावना वस्तीगृह अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी व्यक्त केल्या. व याबद्दल भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या