उस्मानाबाद, दि. 3 ऑक्टोबर (प्रतिनिधी) —रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) तर्फे परंडा तालुका अध्यक्षपदी श्री. शिवाजी पांडुरंग ढेरे (भांडगाव, ता. परंडा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीपत्रावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिन खरात तसेच जिल्हाध्यक्ष राजामाऊ राऊत (धाराशीव) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
श्री.ढेरे यांच्या सामाजिक कार्याचा आणि जनतेशी असलेल्या घट्ट नात्याचा विचार करून ही जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या जबाबदारीनंतर त्यांनी पक्षाच्या धोरणांचा प्रसार करून सामाजिक आणि संघटनात्मक कार्यात जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिन खरात यांनी नियुक्तीपत्राद्वारे शुभेच्छा देत म्हटले आहे की, “आपल्या कार्यकाळात आपण संघटन बळकटीसाठी आणि जनकल्याणासाठी तत्पर राहाल, अशी अपेक्षा आहे.”
यावेळी पत्रकार परिषदेत पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड, रामकृष्ण वाघमारे, राजाभाऊ गायकवाड, बाबासाहेब ओव्हाळ,निवृत्ती हौऊसलमल, सुशील वाघमारे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते






