वागदरी (एस.के.गायकवाड ) :-
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे भव्य आणि दिव्य असी शहरातून धम्म संदेश रॅली काढण्यात आली.
या रॅलीची सांगता नालंदा बुद्ध विहार भीम नगर नळदुर्ग येथे करण्यात आली यावेळी धम्म देशना देताना भन्ते संघानंद म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण दिली असून तें एक मार्गदाता होते.मानव कितीही शत्रू असला तरी त्या मानवाला करुणेने जिंकता येते असा संदेश तथागत भगवान बुद्ध देतात.बुद्धाची शिकवण उदारमतवादी होती.लोकशाहीवादी होती बुद्धाने कधीही दुसऱ्या माणसाच्या विचार स्वतंत्र्यात हस्तक्षेप केला नाही.स्वातंत्र्य विचार हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे.
बुद्ध स्वतःला एक मानवी शिक्षक मानत होते. मानवाने विवेक बुद्धीने विवेकी माणसाशी कुशल कर्तव्य केल्यास मानवाला आनंदी व कल्याणकारी मार्ग मिळतो आणि त्याचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी होतो .बुद्धांनी केवळ अंधश्रद्धा आणि सर्व शक्तिमान अधभूत शक्तीच्या भीतीला पराभव केले असून यज्ञ कर्मकांड आणि धार्मिक विधीमुळे मानवाच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत.यासाठी प्रत्येक मानवाने जनकल्याणकारी अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास समाजातील प्रत्येक मानवाचे जीवन समृद्ध होईल असे परखड मत सोलापूर येथून आलेले पूज्य भन्ते संघानंद यांनी केले.
नळदुर्ग शहरात नुकतच धम्मचक्र प्रवर्तन अशोका विजया दशमीचे औचित्य साधून बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचारासाठी शहरातून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसह धम्म रॅली काढण्यात आली.
यावेळी पुज्य भन्ते शासनसुरी व पुज्य भन्ते अंगुलीमाल यांनी ही धम्म देसना दिली.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुजन नालंदा बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बनसोडे , सेक्रेटरी बाबुराव बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले व पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पंचशिल ध्वज व भन्तेना मानवंदना दिली भन्ते संघानंद भन्ते शासनसुरी भन्ते अंगुलीमाल आदीनी सर्व उपस्थित बौद्ध उपासक व उपासिकाना त्रिशरण पंचशिल दिले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले यावेळी रिपाइंचे जिल्हा सचिव एस के गायकवाड , प्रा.नागनाथ गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांबळे आदिनी आपपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सैनिक पद्माकर पुजारी यांचे पुत्र पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रितकुमार पुजारी , मधुसुदन दुरुगकर , लक्ष्मीताई पुजारी , विद्याताई पुजारी , कोमलताई पुजारी,उषाताई दुरुगकर यांच्या कडुन समाजास तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रदिप्त मुर्ती दान दिल्याने त्या मुर्तीची धम्मरॅली काढून मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली .
यामुळे पुजारी परिवाराचा माजी मुख्याध्यापक स्मृतिशेष सदाशिवराव बागडे गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने अजयकुमार बागडे यांनी सत्कार केला .व रुपाली मनोजकुमार बनसोडे ही सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे बागडे परिवाराकडून सत्कार करण्यात आला.यावेळी धम्मरॅली कमेटी अध्यक्ष रुषीकेश कांबळे यांचा ही सत्कार करण्यात आला नळदुर्ग शहरातून धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही धम्म रॅली कसाई गल्ली,किल्ला गेट,क्रांती चौक,चावडी चौक ,शास्त्री चौक अहिल्यामाई होळकर चौक,नविपेठ मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक अक्कलकोट रोड बुद्धनगर,डॉ आंबेडकर नगर मार्गे बुद्ध विहारा समोर सांगता करण्यात आली.समता सैनिक दलाचे जवान राजरत्न बनसोडे यांनी लेझीम पथकाच्या संगीतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खुप छान गीते गायली आणि मिरवणूकीचे राजरत्न बनसोडे अकर्षण ठरले.
यावेळी डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयमचे स्कुलचे मुख्य प्रवर्तक तथा रिपाइंचे शहराध्यक्ष मारुती खारवे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे , रिपाइंचे मराठवाडा सदस्य दुर्वास बनसोडे , पत्रकार सुनिल बनसोडे योगेश सुरवसे , भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष कुमार ढेपे , योगेश दुरुगकर , गणेश दुरुगकर प्रा भगवान चिमणे , प्रा डॉ पी एस गायकवाड , सचिन कांबळे ,गौतम वाघमारे , सत्याशिल नळदुर्गकर,माजी नगर सेविका विमलताई बनसोडे,सुशिलाताई गायकवाड , राजरत्न बनसोडे,अतुल बनसोडे ,अमर बनसोडे,सह लेझीम संघाचे सर्व,सदस्य महिला बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार 
बौध्दाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले .






