spot_img
spot_img
spot_img

मा. सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध! रिपाइं आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

दि. 06 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू असताना मा. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर वकील राकेश किशोर याने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.

या संदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की —

> “हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर नाही, तर भारतीय न्यायव्यवस्था, संविधान आणि बहुजन समाजावरचा थेट हल्ला आहे. ही घटना मनुवादी विचारसरणी आणि जातीय द्वेषातून प्रेरित असून, ती देशद्रोहापेक्षा कमी नाही.”

राऊत यांनी ठोस मागण्या केल्या :

1.आरोपी वकील राकेश किशोरयाच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच देशद्रोहाचे गुन्हे तात्काळ दाखल करण्यात यावेत.

२.त्या आरोपीची वकिली सनद कायमची रद्द करण्यात यावी.

3.न्यायालयांची सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करावी.

4.देशात जातीय विष पसरवणाऱ्या सनातन संघटनेवर तात्काळ बंदी घालावी.

> “न्यायसंस्थेचा आणि संविधानाचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. जर आरोपीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर सर्व सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरवादी पक्ष व संघटनांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारले जाईल.”

या घटनेने बहुजन समाजात तीव्र संताप निर्माण झाला असून, सर्वत्र न्यायमूर्ती गवई यांच्या समर्थनार्थ निषेधाचे स्वर उमटत आहेत.

आज या संदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत कार्यालयातील तहसीलदार यांना निवेदन देऊन राष्ट्रपतींकडे मागणी करण्यात आली.

या निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष संपत सरवदे,शरीफ शेख (रा. काँ.S.P. अ. सं.वि.),धनराज तुळसे,

रामकृष्ण वाघमारे,सरदार पटेल आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

निवेदनात विशेष नमूद :

> आरोपीवर ॲट्रॉसिटी व देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.

Related Articles

ताज्या बातम्या