spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग नगर परिषदचे आरक्षण सोडत जाहीर महिलाना पन्नास टक्के संधी.सोडत जाहीर होताच काही नागरिकांच्या चेहऱ्यावरील हसू गायब 

नळदुर्ग दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग येथे होऊ घातलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नगर परिषदेच्या सभागृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले यामध्ये प्रभाग निहाय सोडत जाहीर करण्यात आले तर महिलाना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आसुन एकुण २० सदस्या पैकी १० सदस्या ह्या महिला राहाणार आहेत

आज दिनांक ८ अक्टोबर २०२५ सकाळी नगर परिषद येथे पिठासन अधिकारी अरुणा गायकवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी लहान मुलांना घेऊन चिठ्ठी काढून हे आरक्षण जाहीर करण्यात आले .

अगोदर अनुसुचित जातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले नंतर इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले उर्वरीत आरक्षण मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी वाचुन दाखवून नियमा प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले .

प्रभाग १ [अ ] नाममात्र मागास प्रवर्ग महिला [ ब ] सर्वसाधारण

प्रभाग २ [ अ ] अनुसचित जाती पुरुष [ ब ] सर्वसाधरण महिला

प्रभाग ३ [ अ ] नाममात्र मागास प्रवर्ग [ ब ] सर्वसाधारण महिला

प्रभाग ४ [ अ ] सर्वसाधारण महिला

[ ब ] सर्वसाधारण प्रभाग ५ [ अ ] सर्व साधारण महिला [ ब ] सर्व साधारण प्रभाग ६ [ अ ] नाममात्र मागास प्रवर्ग महिला [ ब ] सर्वसाधारण प्रभाग ७ [ अ ] नाममात्र मागास प्रवर्ग [ ब ] सर्व साधारण महिला प्रभाग ८ [ अ ] अनुसुचित जाती महिला [ ब ] सर्व साधारण प्रभाग ९ [ अ ] नाममात्र मागास प्रवर्ग महिला [ ब ] सर्व साधारण महिला प्रभाग १० [ अ ] अनुसुचित जाती महिला [ ब ] सर्व साधारा आशा प्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले आसून आरक्षण जाहीर होताच अनेकांच्या चेहऱ्यावरील हासू गायब झाल्याचे दिसून आले .

अनेकजन नगर परिषदेचा सदस्य बनण्यासाठी गुडग्याल बाशिंग बांधून तयार आहेत परंतु काही ठिकाणी आरक्षण सोडत मना सारखी झाली नसल्याने मने नाराज झाली आहेत पण नगराध्यक्ष पदावरून सर्वसाधारण मधून कोण होणार नगराध्यक्ष याकडे मात्र सर्वाचे लक्ष लागले आहे .

Related Articles

ताज्या बातम्या