spot_img
spot_img
spot_img

धाराशिव जिल्हा अधिकारी कचेरीवर एस टी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा प्रचंड महामोर्चा धडकला : जालना विधान परिषद मतदारसंघातील आमदार राजेश राठोड यांची केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

वागदरी (एस.के.गायकवाड):

धाराशिव जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने बंजारा समाजाचा एस टी आरक्षण प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा धडकला.

दिनांक ८ ऑक्टोबर २o२५ रोजी धाराशिव जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने बंजारा समाजाचा आरक्षणाच्या एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

धाराशिव येथील बार्शी नाका येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यातआली. बार्शी नाका ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणीही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. या ठिकाणी चौकातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा थेट जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला.या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी बोलताना विधान परिषद मतदार संघ जालना चे आमदार राजेश राठोड यांनी देशाच्या सत्तेवर असलेल्या मोदी सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की या देशावर २o१४ पासून ते आज जागाया बंजारा समाजाच्या मतावर मोदी सरकार सत्तेवर आहे.गेल्या अनेक वर्षापासून ची बंजारा समाजाची ही मागणी असून या मागणीकडे सरकार जाणिव पूर्वत दुर्लक्ष करीत आहे. ही अत्यंत खेद जनकबाब आहे.मोदी सरकारने या गोरगरीब भटक्या आदिवासी बंजारा समाजाच्या मागणीकडे जातीने लक्ष देऊन बंजारा समाजाचा एस टी आरक्षणामध्ये समावेश करावा अन्यथा भविष्यात बंजारा समाजाला वेगळा विचार करावा लागेल.याप्रसंगी माजी खासदार हरिभाऊ राठोड,गोर सिकवाडी लढाऊ विजय चव्हाण,तुळजापूर तालुक्यातील अलियाबाद च्या माजी सरपंच ज्योतिका चव्हाण,लक्षण चव्हाण,अपेक्षा जाधव आदींची ही मार्गदर्शनपर भाषणे झाली.यावेळी धाराशीचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बंजारा समाजाचे नेते प्रकाश चव्हाण म्हणाले की बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी जे काही निकष ठरवले गेले आहेत त्या सर्व निकषांमध्ये बंजारा समाज बसतो त्यामुळे सरकारला या समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी कसलीही अडचण येत नाही तेव्हा शासनाने या मागणीचा तात्काळ विचार करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या मोर्चामध्ये विलास राठोड,हरिष जाधव, सुरेश पवार, दिलीप जाधव, वैभव जाधव, आमृता चव्हाण, योगेश राठोड, अतुल राठोड सह धाराशिव जिल्ह्यातील वाडी वस्ती तांड्यातून मोठ्या प्रमाणात महिला,ग्रामस्थ युवा कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते सखल बंजारा समाजाच्या बॅनरखाली प्रचंड संख्येने उपस्थित होते.या वेळी सदर मागण्याचे निवेदन सकल बंजारा समाजाच्या शिष्ठमंडळाने धाराशिव चे जिल्हाधिकारी यांना दिले.

Related Articles

ताज्या बातम्या