(पुणे प्रतिनिधी अजिंक्य मस्के)
आपल्याला मिळालेला घरगुती गॅस आपण कधी वजन करून पाहत नाही. कर्मचारी सिलिंडर घरी घेऊन येतो, सिलिंडर ‘घरपोच’ देण्याचे जास्तीचे पैसे घेऊन निघून जातो. सिलिंडर संपला की पुन्हा ऑनलाइन बुकिंग आणि तीच पद्धत. आपण कधीही सिलिंडरचे वजन मोजून पाहत नाही. परंतु, कात्रजमध्ये अवैधरीत्या रिफिलिंग होत असलेल्या गोडाउनला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर ‘सिलिंडरमधून गॅस काढला जातो’ ही बाब अधोरेखित झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दलित पॅंथर संघटनेचे पुणे शहर संपर्कप्रमुख विशाल गुलाब ओव्हाळ यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
दिवाळी सणांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गॅस चोरीचा प्रकार थांबवून संबंधितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत संबंधित असणाऱ्याएजन्सीचे लायसन्स रद्द करा
भारत भर तसेच महाराष्ट्रात दिवाळी सण मोठ्या थाटा माटात साजरा केलं जातो संपूर्ण औद्योगिक नगरीत आर्थिक उलाढालीचे प्रमाण उच्चांक गाठत असते बाजारपेठा सजलेल्या असतात परंतु काही गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होत असताना आढळत आहे.या अर्जाद्वारे आम्ही आपणाला काही महत्त्वाच्या बाबींची माहिती करून देत आहोत त्यावर आपण कटक्ष पणे लक्ष घालावे.
दिवाळीच्या सणा दरम्यान आमच्या निदर्शनात आलेली गोष्ट म्हणजे “पुणे शहरात वाढती गॅस चोरी ? ”
माननीय महोदय संपूर्ण पुणे शहर भर दिवाळीच्या या सणाच्या तयारी अनेक नागरिक गॅस चोरीच्या समस्येचा शिकार होत आहेत.घरात असलेल्या सणाची गडबड होत असलेली धावपळ व वेळेच्या बंधनात ग्राहक गॅस वजन करून घेण्याकडे सर्व नागरिकांचे दुर्लक्ष होते व याचाच फायदा घेत पुणे शहरातील अनेक गॅस विक्रेते व त्या विक्रेत्यांकडे असणारे अनधिकृत कामगार याचाच फायदा घेत मोठ्या प्रमाणात गॅस चोरी करून हा भोंगळ धंदा व गॅस चोरी ही नागरिकांच्या घरात येणाऱ्या घरगुती मधून केली जाते असे अनेक प्रकार व त्याची असंख्य उदाहरणे संबंधित पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून आज पर्यंत जेवढ्या झालेल्या पोलिस कारवाई मधे ठोस पाऊल चाललेलं गेल नाही याची आम्ही आपणास संक्षिप्त स्वरूपात देत आहोत हे घरगुती गॅस चोरी करून ते गॅस मिठाईवाले व इतर छोटे मोठे दुकानात यांना काळाबाजार करत विकतात व संबंधित ग्राहकांवर एक प्रकारचा अन्याय घडून आणतात यावर आळा घालण्यासाठी दिवाळीच्या सणा अगोदरच आपल्याला काही उपाययोजना आखणे गरजेचे आहे व या आखण्यादरम्यान आपणाकडून आम्हास ही अपेक्षा आहे की सदर गॅस लायसन धारकांची तातडीची मीटिंग बोलून त्यांना यावर निर्बंध घालण्यास सांगावे आणि असा प्रकार ज्या भागात ज्या एजन्सी तर्फे होईल त्यांची एजन्सी चे लायसन त्वरित रद्द केले जाईल असा दम व ताकीद सर्वांना द्यावी जेणेकरून ही गॅस चोरी होणार नाही व कोणताही अनर्थ चे टळेल.
आपण बोलवलेल्या मीटिंगमध्ये मूळ विचारण्यात येणारी प्रश्न म्हणजे
१) गॅस एजन्सी मध्ये काम करणारे कामगार यांचे पोलीस वेरिफिकेशन झालं आहे का ?२) गॅस वितरण करण्या वेळी वापरण्यात येणारा टेम्पोचे RTO पासिंग नाही इन्शुरन्स आहे का? ३)गाडीचे कागद पत्रे नाही अनेक टेम्पो हे भाड्याचे आहेत टेम्पोनचे स्टक्चरल सर्टिफिकेट आहे का?
४)RTO नियमाची बंधनकारक असणारी नंबर प्लेट आहे का? महोदय अश्या विभिन्न प्रकारच्या चुका नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी सर्व गॅस चोरी करणारे कामगार व त्यांना पाठीशी घालणारे सुपर वायझर व मालक या व्यक्तींवर भारतीय दंड व्यवस्था कायद्या अंतर्गत मोकोका सारखे गंभीर गुन्हे दाखल करत संपूर्ण एजन्सी सील तसेच बंद करण्यात यावी ५) ग्राहकांना गॅस वजन करून देतात का ६) ग्राहक स्वतः गॅस गोडाऊनला गॅस घेण्यासाठी आला तर त्याच्या शुल्कातील ३५रु रक्कम कमी घ्यावी लागते ती कोण कमी करणार अशा सर्व प्रकारच्या गॅस चोरीचे प्रकार बंद होतील व हे ग्रुणास्पद कृत्य करणार्यान वर वचक बसेल..






