spot_img
spot_img
spot_img

श्री गणेश प्रिटिंग प्रेस नळदुर्ग चा ४१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

वागदरी (एस.के.गायकवाड):

नळदुर्ग ता.तुळजापूर येथील श्री गणेश प्रिटींग प्रेस चा ४१ वा वर्धापन दिन येथील लोकमान्य वाचनालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रेस मधील जुन्या कर्मचाऱ्यांचा प्रेस चे मालक सौरभ कुलकर्णी यांनी सत्कार करून आपल्या कामगाराबद्दल असलेला आपला आदर व्यक्त करून एक आदर्श समाजापुढे निर्माण केला.

नळदुर्ग हे एक ऐतिहासिक शहर असून जवळपास ६० ते ६५ गावांच्या केंद्रस्थानी आहे. सन १९८५ पासून नळदुर्ग आणि परिसरातील जनतेची गरज ओळखून कै.मनोहर जगन्नाथ कुलकर्णी यांनी या व्यवसायाला नळदुर्ग येथे छोट्याशा पत्र्याच्या गाळ्यामध्ये सुरुवात केली. तथपूर्वी नळदुर्ग आणि परिसरातील जनतेला ज्यांना शक्य आहे अशी मोजकी मंडळी आपल्या विविध कार्यक्रमाच्या लग्न समारंभाच्या निमंत्रण पत्रिका असतील बॅनर असतील किंवा अन्य कुठले छपाईचे कामे असतील ते सोलापूर येथूनच छापून अणत असत.परंतु सर्वसामान्य जनतेला ते परवडणारे नव्हते त्यामुळे या ठिकाणी एखाद्या प्रिटिंग प्रेस ची गरज होती.ही गरज ओळखून कै.मनोहर कुलकर्णी यांनी सन १९८५ ला श्री गणेश प्रिटिंग प्रेसच्या माध्यमातून या व्यवसायाला नळदुर्ग येथे सुरुवात केली.सुरुवातीच्या काळात अक्षराचे खिळे जोडून ते मशीनवर सेटिंग करून मनुष्यबळावर मशिन फिरवून छपाई केली जायची. हळू हळू परिस्थिती बदलत आहे. संगणकीन युग येत आहे.आपण डिजिटल युगात प्रवेश करीत आहोत याची जाणीव कदाचित कै.मनोहर कुलकर्णी यांना झाली असावी म्हणून त्यांनी आपला मुलगा सौरभ कुलकर्णी याना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच संगणकीय शिक्षण दिलं सुरुवातीला मोठ्या कष्टातून उभा केलेला या व्यवसायाचे रूपांतर आज भव्य दिव्य डिजिटल युगामध्ये वटवृक्ष सारखं मोठं झाल आहे.आज या ठिकाणी सौरभ कुलकर्णी यांनी आपल्या वडिलांचा वसा चालवत डिजिटल युगाचा पुरेपूर फायदा घेत सर्व प्रकारची छपाई,मोठे मोठे बॅनर, छोट्या वाढदिवसाच्या निमंत्रण पत्रिका पासून ते सर्व प्रकारचे छोटे मोठे डिजिटल कट आउट बॅनर वगैरेची छपाईची सोय नळदुर्ग शहरांमध्ये केलीआहे. त्यांची ही यशस्वी वाटचाल खरंच आजच्या युगातील तरुणांना प्रेरणादायी आहे.नुकतंच त्यांनी आपल्या श्री गणेश प्रिंटिंग प्रेस चा ४१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणामध्ये विविध उपक्रमाने साजरा केला.

या प्रसंगी ज्यांनी या प्रेसमध्ये सुरुवातीच्या काळात मेहनत घेऊन या व्यवसायाचा पायाभरणा केला अशा सर्व जुन्या कर्मचाऱ्यांची आठवण करून त्यांनी त्यांचा यथोचित असा सत्कार करून त्यांच्याबद्दल चा आदर व्यक्त करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला.

यावेळी लोकमान्य वाचनालयाचे सचिव शशिकांत नाईक,अध्यक्ष पांडू पुदाले,ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाषराव भुमकर,स्वातंत्र सेनानी बलभीमराव मुळे गुरुजी, बाळासाहेब कुलकर्णी, सुधीर हजारे, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे विलास येडगे,शशिकांत पुदाले, सह नळदुर्ग आणि परिसरातील मान्यवर ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते

या प्रसंगी कुलकर्णी परिवाराच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित प्रिटिंग प्रेसच्या नव्या युनिटचे उद्घाटनही करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या