वागदरी (एस.के. गायकवाड):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठवाडा विभाग उपाध्यक्ष तानाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने तुळजापूर येथील शासकीय विश्रामग्रहात अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम संपन्न झाला
प्रारंभी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी अभिवादन करून रिपाइं(आठवले) पक्षाचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष तानाजी कदम यांचा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा भरभरून येथोचित सत्कार केला.या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
तानाजी कदम यानी आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. दलित पँथर ते रिपब्लिकन पक्ष असा एकनिष्ठ तब्बल ४० वर्षाचा प्रवास अध्याप अविरत पणे चालूच आहे.दाम्यानच्या काळात रिपब्लिकन चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब सामान्य जनतेच्या आणि समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर अनेक वेळा मोर्चे आंदोलने करून सामाजिक न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बहुजनातील अनेक गोरगरीब जनतेला वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना त्यांनी मिळवून दिलेल्या आहेत.
दलित पॅंथर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा नामदार रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तागायत एकनिष्ठ असलेले सामाजिक जाणीवेचे कार्यकर्ते म्हणून त्यांची जन माणसात ओळख आहे. त्यांच्या सुविध पत्नि a वैशाली ह्या तुळजापूर नगर परिषदेच्या माजी सदस्या म्हणून आपल्या पतिबरोबर सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
तानाजी कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजि कार्यकमास रिपाइंचे तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, रोजगार आघाडीचे तालूका अध्यक्ष आप्पा कदम, प्रा. अशोक कांबळे,युवा आघाडीचे विष्णू सोनवणे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






