वागदरी ( एस.के. गायकवाड ):
मौजे येडोळा ता तुळजापूर येथे वर्षावास निमित्ताने आयोजित बुद्ध वंदना व धम्मदेशना कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असून या निमित्ताने येथील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला
बौद्ध धम्म संस्कारा नुसार आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा हा तिन महिन्याचा कालावधी वर्षावासाचा कालावधी म्हणून पाळला जातो या तीन महिन्यांमध्ये बौद्ध बांधवांच्या वतीने बौद्ध धर्म प्रसार आणि प्रचारार्थ बुद्ध वंदना व धम्मदेशना मालिकेचे आयोजन करण्यात येते त्याचाच भाग म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव आणि सिद्धार्थ कला व क्रीडा मंडळ येडोळा ता.तुळजापूर येथे वर्षावासाच्या काळात बुद्ध वंदना व धम्मदेशना मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.या वर्षावासाच्या कार्यक्रमाची सांगता आणि गुणवंत विद्यार्थी धर्मवीर देवानंद लोंढे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन नुकतच येडोळा करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन विभागाचे Ooltah उपाध्यक्ष विश्वासभाऊ पांडागळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, रिपाइं (आठवले) नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे,माजी सरपंच पद्माकर पाटील, दिनकर पाटील, ग्रा.प सदस्य दिगंबर पाटील रिपाइं (आठवले ) जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,प्रा.भास्कर वाघमारे आदी उपस्थित होते.
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध,व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी संपादन केल्याबद्दल येथील विद्यार्थी धर्मवीर देवानंद लोंढे यांचा आजी व आई वडीला समवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी एस.के.गायकवाड,विश्वास भाऊ पांडागळे, राजश्री ताई कदम विजय बनसोडे,मारुती खारवे प्रा.भास्कर वाघमारे आदींची आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन समता सैनिक दलाचे मल्लिनाथ लोंढे यानी केले तर आभार अमर जेटीथोर यानी केले.
या वेळी रामचंद्र लोंढे, सुरेश लोंढे,अर्जुन लोंढे,मारुती लोंढे, प्रवीण कांबळे,अंकुश लोंढे अमित लोंढे,सुरज लोंढे,भानूदास लोंढे,अंकुल वाघमारे,शंकर भंडारे,गणेश बिराजदार,अकाश झेंडारे, रमेश वाघमारे सह महिला ग्रामस्थ युवा कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.






