spot_img
spot_img
spot_img

प्रा.डॉ. सत्येंद्र राऊत यांना लोकसेवा गौरव पुरस्कार

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

अणदूर जवाहर महाविद्यालय येथील संस्कृत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा.डॉ. सत्येंद्र राऊत यांना मुंबई येथील लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि एम.व्ही.एस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय एकता सन्मान महासोहळ्यात नवी मुंबई वाशी येथे साहित्य मंदिरात मा. लेफ्टनंट कमांडर निलेश झोपे, मा. सुधाकर पाटील,मुंबई येथील सहाय्यक पोलीस आयुक्त मा. रामचंद्र नागरगोजे, मराठी व हिंदी सिने अभिनेत्री अदिती सारंगधर, केतकी गावडे, ऊर्मिला डांगे तसेच मंत्रालयातील सांस्कृतिक विभागाचे मा. संजीव कुमार, प्रेरणादायी व्याख्याते मा. सीमा वाघ आणि संस्थेच्या संयोजिका सौ. सलमा एन. खान यांच्या हस्ते शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र लोकसेवा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ.सत्येंद्र राऊत यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मोठे योगदान पाहून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. हा वैशिष्ट्यपूर्ण असलेला पुरस्कार मिळाल्याबद्दल जवाहर संस्थेचे सचिव मा.रामचंद्र दादा आलुरे, महाविद्यालय विकास समितीचे संचालक अॅड मा. लक्ष्मीकांत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी,उपप्राचार्य डॉ.मल्लीनाथ लंगडे तसेच आदर्श पत्रकार श्री. विजय पिसे व सहशिक्षिका श्रीम. दीपमाला खडके, महादेव राऊत आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. राऊत यांचे अभिनंदन केले.

Related Articles

ताज्या बातम्या