spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग येथील भिमनगर मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक ” स्पेशल ” शाळेची इमारत धोकादायक

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपीचे सोंग घेऊन इमारतीकडे अक्षम दुर्लक्ष केले .

———————————————

नळदुर्ग दादासाहेब बनसोडे 

नळदुर्ग दलित वस्तीत भीमनगर मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक [ स्पेशल ] शाळेत गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असतात या शाळेची इमारत खूप मोठ्या प्रमाणात धोकादायक बनली आहे या इमारतीकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अक्षम दुर्लक्ष होत आहे

नळदुर्ग येथे जिल्हा परिषद प्राथमिक स्पेशल शाळा पूर्वजांनी विशेष घटक म्हणून ही शाळा दलित वस्ती सुरुवात करण्यात आली परंतु या शाळेकडे जिल्हा परिषद धाराशिव येथील शिक्षण विभागाचे कोणत्याही अधिकाऱ्याचे जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे झोपीचे सोंग घेऊन दलित वस्तीतल्या शाळेकडे अक्षम दुर्लक्ष केले जात आहे, शिवाय स्पेशल शाळेमध्ये एक ते चार वर्ग असून या वर्गांची पटसंख्या सुद्धा बरोबर आहे दलित विद्यार्थी शिक्षण समूहाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहशिक्षक एस डी टिळक व एस यू शेख प्रामाणिक प्रयत्नशिल आसतात परंतू तेथील

विद्यार्थांना मार्गदर्शन किंवा अध्यापन करण्याकरिता इमारत सुसज्ज आसायला हवी प्रत्येक वर्गात पाण्याची धार लागली आहे

मग शिक्षकांनी कसे अध्यापन करायचे शाळेतील प्रारंगण पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात घाण दिसुन येते शिवाय शाळेतील शौचालय आसून आडथाळा नसुन खोळंबा या म्हणी प्रमाणे दयनिय अवस्था झाली आहे .

या शाळेला शिक्षका शिवाय कोणतेही अधिकारी फिरकत सुद्धा नाहीत या विषयी मात्र पालकात नाराजी व्यक्त केली जात आहे

पुर्वजानी खास बाब म्हणून जिल्हा परिषद कडून जिल्हा परिषद प्राथमिक [ स्पेशल ] शाळा आणली आहे दलित वस्तीतील विद्यार्थांनी शिक्षण घेण्यासाठी सतत कार्यरत आसणारी मंडळी त्यावेळी खुप चांगली होती . शिक्षणा विषयी प्रत्येक मानवाला गुणवंता वाढावी गुणवंता पुर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक आज ही तत्पर आहेत परंतू शाळेच्या इमारतीची ऐवढी भयानक अवस्था झाली आहे की , शिवाय दुर्गंधी ही खुप मोठ्या प्रमाणात वाढली आहे .

कारण प्रत्येक शिक्षक आसो किंवा पालक आसेल किंवा विद्यार्थी आसो शिक्षका बरोबर विद्यार्थांची गुणवत्ता वाढली पाहिजे हे महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट करत आहेत .

शिक्षण विभागाने या जिल्हा परिषद स्पेशल शाळेकडे लक्ष केंद्रित करून तेथील तात्काळ विद्यार्थांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभागाने तात्काळ दोन रुम इमारतीची सोय करावी . जेने करून सहशिक्षका एस डी टिळक व एस यू शेख अध्यापन करतील व विद्यार्थी ही गुणवंता प्राप्त करतील जिल्हा परिषदेने तात्काळ ही जिर्ण व धोकादायक इमारत जमीनदोस्त करून नविन इमारत उभी करावी आशा प्रकारची मागणी नागरीक व पालक वर्गातून होत आहे .

Related Articles

ताज्या बातम्या