spot_img
spot_img
spot_img

काक्रंबा जिल्हा परिषद गटातून रिपाइंचे बाबासाहेब मस्के संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविणार 

वागदरी ( एस.के.गायकवाड ):

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा जिल्हा परिषद गटातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब मसाजी मस्के हे संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे समजते.

भारतीय दलित पॅंथर पासून ते आजतागायत देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारता राज्य मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ अरून नामदार रामदास आठवले यांचे ते निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

बाबासाहेब मस्के हे तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मेसाई ) येथील आंबेडकर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून सामाजिक,राजकीय, चळवळीत ते सर्वत्र परिचित आहेत.काक्रंबा जि.प. गट हा अनुसुचित जाती साठी राखीव असून बाबासाहेब मस्के हे या गरातून संपूर्ण ताकतिनिशी निवडणूक लढविण्याचा निर्धार पक्का केला आहे.

ते रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते असून नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली पॅंथरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सामाजिक राजकीय कार्याला सुरुवात केली असून गेल्या अनेक वर्षांपासून ते तुळजापूरच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातीत सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वत्र परिचित आहेत.मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्यांनी तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दिवटी ) पंचायत समिती गणातून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना अवघ्या काही मताने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे लांचा जनसंपर्क दांडगा असून सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून ते आपले काम करतात.गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीला धावून जातात. श्रावणबाळ योजना,संजय गांधी योजना,इंदिरा गांधी योजना आधी योजनेतील लाभार्थ्यांना वृद्धांना विधवा परितक्ता महिलांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचा मोठा हातखंड आहे.आतापर्यंत त्यांनी अशा गरजू अनेक लोकांना मानधन मिळवून दिलेले आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या माध्यमातून भूमीहीन . दलित कुटुंबाला जमीन मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या धोरणाचा ते काटेकोरपणे पालन करतात.गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आयोजित मोर्चे आंदोलने निदर्शने यामध्ये ते सक्रिय असतात. त्यांच्या पहाडी आवाजाने ते सर्वांचे लक्ष विशेषता शासनाचे लक्ष वेधून घेतात आणि जोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायासाठी झगडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची एक ओळख आहे.

जिल्हा परिषद काक्रंबा गटामध्ये त्यांचा फार मोठा जनसंपर्क आहे.विशेषत सर्व जाती धर्मात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)., भाजपा व मित्र पक्ष महायुतीच्या माध्यमातून या गटातून संपूर्ण ताकतीनिशी निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. रिपाइं भाजपा व मित्र पक्षाच्या महायुतीतून त्यांना जर संधी दिली तर त्यांचा विजय निश्चित आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

Related Articles

ताज्या बातम्या