spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक : गणेश पाटील यांच्या उमेदवारीने रंगत आणली!

तुळजापूर प्रतिनिधी : 

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून प्रत्येक प्रभागात नवनवीन चेहरे आणि नव्या समीकरणांचा उदय होत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचाराच्या धुमधडाक्यामुळे निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगला आहे. नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण असून, प्रत्येकजण आपल्या आवडत्या उमेदवाराच्या विजयासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे.

प्रभाग क्रमांक एकमध्येही अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली असून या प्रभागात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तसेच शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील हे एक सक्षम आणि ऊर्जावान नेतृत्व म्हणून चर्चेत आले आहेत. पाटील यांनी पक्षाकडे अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज सादर केला असून त्यांच्या दावेदारीमुळे या प्रभागातील स्पर्धा अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

गणेश पाटील हे युवा कार्यकर्त्यांशी सतत संपर्कात राहून सामाजिक कार्य, नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ तोडगा आणि लोकसहभाग यावर भर देणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेत चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या या लोकसंपर्कामुळे त्यांचा प्रभाव वाढला असून युवकवर्गात त्यांना विशेष पाठिंबा मिळत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर ‘आमचा नेता पावरफुल!’ अशी टॅगलाईन वापरून गणेश पाटील यांच्या प्रचाराचे पोस्टर, व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रभागात डिजिटल मोहिम राबवून उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

तुळजापूर शहरात सध्या प्रत्येक गल्लीत निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांनी अंतर्गत बैठकांना वेग दिला असून कोणत्या प्रभागातून कोणाला संधी मिळणार यावर सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबतही चर्चेचा सिलसिला सुरू आहे.

राजकीय पातळीवर पाहता, गणेश पाटील यांच्यासारखे तरुण, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक नेतृत्व तुळजापूरच्या राजकारणात नव्या ऊर्जेचा संचार करत आहे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. लवकरच निवडणुकीचा आराखडा जाहीर होणार असून त्यानंतरच कोण कोणाच्या विरोधात रिंगणात उतरणार हे स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी गणेश पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे प्रभाग क्रमांक एकमध्ये तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या