spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग नगर परिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक ३ (अ) मध्ये भाजपाचे दत्तात्रय दासकर यांची जोरदार उमेदवारी  अर्ज दाखल

नळदुर्ग, दि. १६ नोव्हेंबरनळदुर्ग नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवत जोरदार उमेदवारी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक ३ (अ) मधून श्री. दत्तात्रय अंबदास दासकर यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यामुळे या प्रभागात राजकीय वातावरण तापले आहे.

दासकर यांनी अर्ज दाखल करताना भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली. या प्रसंगी दासकर यांनी भाजप सरकारच्या विकासाच्या ध्येयधोरणांची माहिती देत, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

नळदुर्गच्या विकासात आपणही हातभार लावू इच्छित असल्याचे सांगत दासकर यांनी जनतेचा कौल मिळवण्याची आशा व्यक्त केली.

👉 राजकारणात तळागाळातील माणसांना चालना देण्यासाठी दासकर यांची निवड महत्त्वाची ठरू शकते.

Related Articles

ताज्या बातम्या