spot_img
spot_img
spot_img

जळकोट येथे समर्थ क्लासेसच्या वतीने डॉ. विठ्ठल लहाने यांचे मार्गदर्शन शिबिर

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे समर्थ क्लासेस व समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण, करिअर मार्गदर्शन व समाजजागृती या हेतूने एक विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालक व विविध स्तरांतील व्यक्तींना उद्देशून आधुनिक शिक्षण पद्धती, करिअर दिशा, वेळ व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास व यशस्वी आयुष्याची आखणी याविषयी सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे

ख्यातनाम व्याख्याते व प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने

यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

त्यांची उपस्थिती विद्यार्थी, पालक व उपस्थित श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

सदर मार्गदर्शन शिबिर दि. 23 नोव्हेंबर 2025, रविवार, सायंकाळी 4.00 वा. श्री केदारलिंग मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे.

आपल्या संस्थेतील सदस्यांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, ही विनम्र विनंती. असे समर्थ क्लासेस वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या