spot_img
spot_img
spot_img

दलित पॅंथर संघटनेच्या वतीने स्वारगेट येथे रस्ता रोको आंदोलन

पुणे प्रतिनिधी अजिंक्य मस्के

मालेगाव डोंगराळे गावात चार वर्षाच्या चिमुकली सोबत नालायक हरामखोराने नराधमाने शारीरिक शोषण करून, तोंडावर दगड टाकून निर्गुण हत्या केली त्याच्या निषेधार्थ दलित पॅंथर संघटनेच्या वतीने स्वारगेट चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले

यावेळी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम पुणे शहर अध्यक्ष आकाश भाऊ पायाल पुणे शहर संपर्कप्रमुख विशाल भाऊ ओव्हाळ सातारा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भाऊ साळवे सातारा जिल्हा अध्यक्ष अमोल भाऊ पवार संदीप क्षीरसागर सचिन शिरसागर गणेश आरने आप्पा लांडगे अशा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

यावेळी यशवंत भाऊ नडगम आपला निषेध व्यक्त करताना म्हणाले की, या नराधमाला जलद गतीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे

ह्या जगात आज घडीला मुलगी सांभाळणं आणि तिला मोठ करण खूप अवघड गोष्ट झाली आहे.

आज जगात बेरोजगारी मुळे अनेक टोणग्यांचे लग्न जमत नाहीत मग हेच लोक अशे नराधम म्हणून आपल्या आजूबाजूला वागत असतात.

असल्या नीच वृत्तीच्या लोकांना वयातला फरक कळत नसेल का, दिवसभर काही काम धंदा न करता बोंबलत फिरणाऱ्या आणि डोक्यात हवस ठासून भरलेल्या असल्या सडक्या मेंदूच्या व्यक्तींना भर चौकात उघडा नागडा करून मारला पाहिजे.

आज ह्या बाळाच्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल ह्याचा विचार आपण कोणीच करू शकत नाहीत.

करणारा करून जातो आणि ज्याने मरण यातना भोगल्यात त्यासाठी जास्तीत जास्त दोन ते चार दिवस इथली यंत्रणा हातात जळक्या मेणबत्या घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून रस्त्यावर न्यायची भीक मागत फिरतात.

ती फक्त मुलगी म्हणून जन्माला आली एवढीच काय तिची चूक असेल.

कोणी चॉकलेट देते म्हणून विश्वासाने एखाद्याच्या कडेवर बसणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीला काय कळतंय कोणाच्या मनात काय चालू आहे ते.

घराबाहेर खेळणाऱ्या मुलीला चॉकलेट चे आमिष दाखवून घरात बोलावून तिच्यावर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारले.

शेजारी राहणारा मुलगा आपल्या लेकरासोबत असे दुष्कृत्य करेल अशी पुसटशी ही कल्पना त्या चिमुरडीच्या आईवडीलांना आली नाही.

आज सगळे जण बेटी बचाव बेटी पढाव ह्या वर फक्त जोर देतात पण जन्माला आलेली बेटी सुरक्षित कशी राहील ह्याच उत्तर मात्र कोणाकडे नाही.

प्रत्येक वेळी पालक मुलीसोबत राहू शकत नाहीत, अशा एक न अनेक घटना आजवर ह्या महाराष्ट्रात घडल्या अनेकाना शिक्षा झाल्या पण अजूनही ठोस कायदा अशा घटना घडू नयेत म्हणून करण्यात आला आहे का नाही माहित नाही.

सरकार चौकशी करेल व दोषींना फाशी ची शिक्षा सुनावेल ह्यात काही दुमत नाही पण पुन्हा कोणती मुलगी अशा घटनेची शिकार होऊ नये अशी कायमची व्यवस्था करावी अशी दलित पॅंथर संघटनेची प्रमुख मागणी आहे

#dalit panther #दलित पँथर

#RapeCase #मालेगाव #nashikcity #littleangel #sadstory #justice #BetiBachaoBetiPadhao #security #womenssafety #girlssafty — in Malegaon.

Related Articles

ताज्या बातम्या