spot_img
spot_img
spot_img

काटगाव बौद्धांच्या स्मशान भुमीच्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर , लाकडी ग्राम पंचायतीच्या समोर

तुळजापूरचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांच्या मध्यस्तीने प्रश्न तोडगा 

नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे 

तुळजापूर तालुक्यातील काटगावा दलित वस्ती मधील यूवक नागरीक अनिल पांडुरंग गोरसे यांची मयत झाल्याने प्रेत अंत्यविधीसाठी घेऊन जायाला रस्ता नसल्याने गावातील त्रस्त नागरिकांनी अंदोलन करत अंत्यविधी साठी दलित लाकडी चक्क ग्राम पंचायत समोर आणून टाकली आहेत

स्मशान भूमीकडे प्रेत घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले

वेळोवेळी वरिल विषयी जिल्हाधिकारी धाराशिव , मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव गटविकास अधिकारी तुळजापूर तहसिलदार तुळजापूर यांच्याकडे अनेक वेळेस पाठपुरावा केला परंतू दलित जनतेच्या अर्जाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली गेली आहे सदरील नदी पाठाकडे कोणीही लक्ष न दिल्याने हा प्रस्ताव धुळखात पडुन होता

गावकुसा बाहेर दलितांची घरे आणि स्मशान भूमी आहे केवळ दलितांचीच नव्हे तर संपूर्ण गावाची आहे शेतकरी आणि गावकरी सुद्धा याच रस्त्यावरून ये जा करीत आसतात .दलित जनतेचा खूप महत्त्वाचा प्रश्न असून या प्रश्नाकडे प्रशासनाने ल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे या नदीच्या पाटाकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने आज ही प्रश्न ऐरीणीवर आहे

दलित समाज या ठिकाणी प्रेत घेऊन समोर थांबलेला आसताना सनदशीर मार्गांचा अवलंब करून तुळजापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे सर्व नागरीक ग्रामसेवक ग्रा प सदस्य यांच्या समोर या विषयाला अनुसरून तोडगा काढण्यात आला

[ चौकट ]

गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे

हा प्रश्न बौद्ध नागरीकांचा नव्हे तर संपूर्ण गावकरी शेतकरी यांचा आहे

खुप मोठा आहे हा प्रश्न नक्कीच मार्गी लावू यामध्ये नदी साफ करणे इस्टीमेंट तयार करणे आदि विषयाला अनुसरून आपण सर्वजन मा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन हा प्रश्न मार्गी लावू परंतू सध्या आचार संहिता चालू आहे यावेळी आम्ही निवडणूकीची कारवाई चालू आहे .

आचार संहिता संपताच आपण या प्रक्रियेस प्रारंभ करू आसे बोलत मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले

यावेळी गावातील प्रथम नागरीक अशोक माळी , ग्रामसेवक संजय घोंगरे ग्रा प सदस्य सुर्यकांत कांबळे

शशीकांत गोरसे , पोपट गोरसे , सोमनाथ कांबळे , दिंगबर गोरसे

मिलींद कांबळे , प्रशांत गोरसे , लक्ष्मण गोरसे , चंद्रकांत कांबळे ,

चंद्रकांत गोरसे , शिवाजी साखरे

मिलींद सोनवणे , खंडु गवळी , मधुकर जाधव , भागवत साखरे भागवत साखरे , प्रथम गोरसे आदिसह दलित नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .

Related Articles

ताज्या बातम्या