spot_img
spot_img
spot_img

किरण कांबळे यांच्या मोबाईलने काढलेल्या फोटोला दुबईत आंतरराष्ट्रीय मान्यता

प्रतिनिधी. अणदूर 

अणदूर येथील छायाचित्रकार किरण कांबळे यांची एक अभिमानास्पद निवड झाली असून, त्यांनी मोबाईलवर कॅप्चर केलेला फोटो दुबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेच्या अंतिम फेरीस निवडला गेला आहे. अत्याधुनिक कॅमेरे, प्रगत उपकरणे यांच्याऐवजी फक्त मोबाईलवर घेतलेल्या या फोटोने जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली आहे.

या स्पर्धेत जगभरातील ४० पेक्षा जास्त देशांमधून हजारो छायाचित्रांचा सहभाग होता. आकर्षक रंगसंगती, विषयाची निवड आणि भावनांना स्पर्श करणारा दृष्टीकोन यामुळे किरण यांच्या फोटोने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

किरण कांबळे म्हणाले, “मोबाईलवरही उत्कृष्ट क्षण टिपता येतात, फक्त दृष्टीकोन वेगळा हवा. माझ्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणे ही मोठी प्रेरणा आहे.”

अणदूर परिसरातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेली ही निवड स्थानिक पातळीवरही उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. अनेकांनी किरण यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

किरण कांबळे यांच्या या कामगिरीमुळे अणदूर नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या